बीज राखी निर्मितीतून संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात अकराशे महिलांना मिळाला रोजगार.

बीज राखी निर्मितीतून संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात अकराशे महिलांना मिळाला रोजगार.

*बीज राखी अभियानातुन संभाजीनगर जिल्यातील फुलंब्री तालुक्यात अकराशे महिलांना मिळाला रोजगार*

आदिवासी मंत्रालय भारत सरकार आणि श्री श्री ॲग्री इन्स्टिट्यूट बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिलांना रोजगार देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी *बीज राखी* अभियानाला 2021पासुन औंरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री,सिल्लोड तालुक्यातील गावातून सुरुवात केलेली आहे. मागील वर्षी या अभियानाच्या माध्यातून 1100 महिलांना रोजगार उपलब्ध झाला होता. महत्वाचे जवळपास 10 लाख वृक्ष लागवड करण्याचे ध्येय साध्य झाले होते.

चालु वर्षी फुलंब्री तालक्यात हा उपक्रम सुरू असून जवळपास 1100 महिलांना याही वर्षी हाताला काम देणे शक्य झाले आहे.आदिवासी महिला किसान मंचच्या महिलांनी "बीज राखी" ची विस्तृत अशी श्रेणी आणि ती बनवण्याची प्रकिया प्रदर्शित केली आहे. अतीशय सुबक व कल्पकतेने गावरान देशी बियांनापासुन बीज राख्या बनवल्या आहेत.वनक्षेत्र वाढवण्यासाठी आणि हवामान बदलाशी लढण्यासाठी हे अद्वितीय योगदान आहे.

या बीज राखीसाठी हादगा, सूर्यफुल,धनी (कोथंबिर)आणि गुंज (रत्ती) या विषमुक्त सेंद्रिय बियाणांचा वापर केला जात आहे. अशी अभिनव पर्यावरण प्रिय राखी बनवली जात आहे.या माध्यमातुन ग्रामीण भागातील आदिवासी महिलांच्या कलाकृतीचे अभिनव सादरीकरण या बीज राखीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. रक्षाबंधन उत्सवाच्या नंतर ही राखी वापरून झाल्यानंतर यातील बियाणे परसबागेत,कुंडीत अथवा शेतात लागवड करुन पर्यावरणाला साद घालण्याचे अंतिम उद्दीष्ट आहे शिवाय इतर प्रकारच्या राख्यांच्या माध्यमातून होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी ही राखी महत्वाची भुमिका निभावणार आहे.सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण रक्षणाचा अमुलाग्र संदेश दिला जात आहे.शिवाय आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे