चापोली येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मनसेचे तीव्र रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी - चाकूर पंचायत समितीतील भ्रष्टाचार विरोधात एल्गार तसेच शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी यासाठी चाकूर तालुक्यातील चापोली येथे राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .चाकूर पंचायत समितीत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पंचायत समिती मध्ये गोठा,विहिरी,शौचालये अश्या योजना येत आहेत या योजना शेतकऱ्यांना मंजूर करून द्या अशी आर्थिक मागणी या आंदोलनात करण्यात आली. तसेच पंचायत समिती मध्ये हस्तकां मार्फत फाईली मागवून देवाणघेवाण झाली तरच मंजुरीची सही होत आहे यावर तात्काळ कार्यवाही होईल असे गटविकास अधिकाऱ्यांनी आठवड्यापूर्वी मनसे शिष्टमंडळाला आश्वासन ही दिले होते परंतु आश्वासनानंतर ही त्यावर कुठलिही कार्यवाही झाली नाही त्यामुळे चापोली येथे रास्तारोको आंदोलन करून झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागृत करत आहोत असे डॉ भिकाणे यांनी सांगितले.तसेच तिबार पेरणी,गोगलगायी,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी निवेदने देऊनही पंचनाम्या पलीकडे सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली नाही त्यासाठीही रस्त्यावर उतरून हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,तालुकाउपाध्यक्ष तूळशीदास माने,चापोली शाखाध्यक्ष बसवराज होणरावकृष्णा गिरी, राजकुमार हादवे शंकर पाटील, चंदू मल्लीशे, मालू कोरे, दगडू शावाळे, नागेश माने, रोहण सलगर, चंद्रकांत सुळ, अजय सुरनर, रामेश्वर देवक्त्ते, राज होनराव, शेतकरी माधव, कोटबळे ,संग्राम होनराव, सुधाकर शंकरे, विरभद्र स्वामी, निळकंठ होनराव, अंतेश्वर होनराव, शेषेराव तेलंगे, सुभाष श्रीमंगले, जिलानीभाई शेख, विजय शंकरे आदी उपस्थित होते.