भारतीय पत्रकार संघटणेचे महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णा गायकवाड यांना गरूड फाऊन्डेशनने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन केले सन्मानित.

पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांना हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल - खासदार निलेश लंके
"खासदार निलेश लंके व गडचिरोलीचे सहा . पोलीस आयुक्त संदीप भांड यांच्या हस्ते मिळालेला सन्मान अविस्मरणीय राहील - अध्यक्ष कृष्णा गायकवाड"
गरुड फाउंडेशन आणि युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अण्णासाहेब शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पिंप्री अवघड येथील रहिवासी असलेले कृष्णा गायकवाड यांनी आपल्या उत्कृष्ठ पत्रकारितेने समाजामध्ये वेगळा ठसा उमटवून भारतीय पत्रकार संघटनेचे नावलौकीक वाढवीला असून त्यांच्या संघटनेतील सर्व पत्रकारांनी समाजात उल्लेखनीय काम करून समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देणारी पत्रकारीता केली आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेत गरुड फाउंडेशन तसेच या कार्यक्रमाचे आयोजक रमेश खेमनर यांनी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारीता पुरस्कारासाठी निवड केली . या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके व गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप भांड यांच्या हस्ते कृष्णा गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान करते वेळी खासदार निलेश लंके व पोलीस आयुक्त संदिप भांड यांनी कृष्णा गायकवाड यांच्या पाठिवर कौतुकाची थाप टाकत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप रमेश भांड हे होते. प्रमुख उपस्थितीत खासदार निलेशजी लंके, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर, गरुड फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पुजारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण भोसले, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, सरपंच शेखर चोरघे, मा.सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, सरपंच अप्पासाहेब, तमनर, हभप अमोल महाराज पिसे, हभप प्रेमानंद महाराज शास्त्री सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांनी गरुड फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना या सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना नवचैतन्य लाभले असून, हे पुरस्कार त्यांच्या भावी वाटचालीस नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशा प्रतिक्रिया दिल्या.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आणखी प्रभावी समाजकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच"अशा पुरस्कारांमुळे कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळते आणि पुढील कार्यासाठी प्रेरणाही " मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन गरुड फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष रमेश खेमनर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी रामचंद्र थोरात, रंगनाथ तमनर, अप्पासाहेब तमनर, पत्रकार अशोक मंडलिक, आर. आर. जाधव, जावेद शेख, सोमनाथ वाघ, कृष्णा गायकवाड, मनोज साळवे, शरद पाचरणे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.आर. जाधव यांनी केले, सूत्रसंचालन अप्पासाहेब ढोकणे यांनी केले, तर आभार अनिल 'डोलनर' यांनी मानले.