लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीमुळे चारगाव बनेल प्रेक्षणीय स्थळ!
1.
काटोल ते नागपुर रोडवरती वसलेल चारगाव येथे ग्राम पंचायत चे पुढाकाराने दिल्ली येथील लाल किल्ल्या प्रमाने 35 बाय 65 फुट स्टेज सामान्य फंड तथा लोकवर्गनीतुन प्रतीक्रुती कमी बजेटमधे बनविन्याचा प्रयत्न केल्या जात आहे. यामुळे तथा इतर विकास कामामुळे चारगाव हे गाव नक्कीच 'प्रेक्षनीय स्थळ' बनेल असी आशा काटोल पं.स.चे सभापती संजय डांगोरे यांनी भेटी दरम्यान व्यक्त केली. सभापती संजय डांगोरे यांनी चारगाव येथील शाळा,अंगनवाडी,ग्राम पंचायत येथील कामाचे निरक्षन करुन समाधान वेक्त केले.
300 लोकसंख्या असनार्या चारगाव ग्राम पंचायत स्थापनेच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षात अनेक कामे गावात पुर्ण झाली आहे. तथा काही प्रगतीत आहे. माजी सरपंच अंजना परतेती तथा उपसरपंच संघपाल बागडे यांनी स्टेज आणि पटांगनाचा उपयोग व्यवसायिक दृस्टीने केल्यास ग्राम पंचायतीचे उत्पन्न पुढील काळात नक्कीच वाढेल असा ध्यास बांधुन अनेक विकास कामाचे नियोजन करन्यात आले.
यावेळी सभापती संजय डांगोरे यांच्या सोबत सरपंच सौ.माधुरी संघपाल बागडे,सामाजीक कार्यकर्ते संघपाल बागडे,विनोद कंकाले, सौ.पायल देशभ्रतार, सौ.पुष्पा बागडे, सौ.संगीता दुपारे ,निलेश दानव,प्रताप पंचभाई,चंद्रपाल परतेती,मुख्याध्यापीका हशिना शेख,आरती कुरवाडे,सुलोचना पाटील,श्री शेंद्रे आदी उपस्थीत होते.