*श्री.सती अनुसया माता जन्मोत्सव पित्यार्थ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 31 जोडपी विवाहबद*
1.
काटोल :- आज समाजामध्ये विदारक दृष्ट्या पाहावयास मिळतात, सासू-सून-सासरे, यांच्या नात्यामध्ये दुरी निर्माण झाली आहे. तेव्हा अशा कार्यक्रमाचे माध्यमातून जवळील निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य होते. "परमेश्वर आणि माणूस यांची गाठ होण्याचे महत्वाचे मध्यम म्हणजे भजन आणि किर्तन" आहे.
असे विचार श्री.सती अनसूया माता संस्थानचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी व्यक्त केले. ते श्री. सती अनुसया माता संस्थान परिसरात दि. 5 मे 2022 ते 11 मे 2022 पर्यंत आयोजित जन्मोत्सवाचे समारोपीय कार्यक्रम आणि सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते.
जन्मोत्सवाची सांगता ह.भ.प. कन्हेरकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन सर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळ्याने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे, संस्थानचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर, ह.भ.प. धनराजजी काळे महाराज, ह.भ.प. कळंबे महाराज, प्रा. देविदास कठाने, उपाध्यक्ष धनराजजी बेलसरे, सचिव चिंतामनराव खंडाईत, विश्वस्त विठ्ठलराव टेंभे, दिनेश ठाकरे, कांतक ठवकर, किशोर गाढवे, दिवाकर सोमकुवर, महेंद्र खंडाईत, डॉ राजीव काळे, जेष्ठ नागरीक अशोकराव काळे उपस्थित होते.
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळयात 31 जोडपी विवाहबद झाली, नावदाम्पत्यास संस्थानचे वतीने सुधाकर कोहळे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आले..
सात दिवसपर्यंत कीर्तनाचे माध्यमाने अनेक सामाजिक विषयाची जनजागृती करणारे ह.भ.प. साहेबराव कन्हेरकर महाराज यांचा संस्थानचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांचे तसेंच ह.भ.प. कळंबे महाराज, ह.भ.प. सोपान कन्हेरकर महाराज, श्री संत यशवंत माऊली महिला मंडळ मोरचुद ता. वरुड च्या अध्यक्षा सौ नंदा वासुदेव भोंगे यांचा दिनेश ठाकरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
जन्मोत्सवाच्या यशस्वीतेकरिता मोरेश्वर गवळी यांचे मार्गदर्शनात अमोल चोरे, सुमित बबुटा, विष्णुजी पेलागडे, वासुदेव बावणे, राजू कुबडे, विलास कुकडे, सुरेंद्र हजारे, सुनील मेटांगळे, सचिन ढोले, ओंकार भक्ते, नारायण तळहांडे, विठ्ठल चिखले, विनोद ढोले, गोविंद ढोले आदींनी परिश्रम घेतले.