शेवगाव 30 नोव्हेंबर 2021 अखेर भाऊसाहेब घनवट आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा. चिठ्ठीत नाव असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर नातेवाईक ठाम

BPS Live News - महाराष्ट्र - अहमदनगर - ता - शेवगाव - न्युज रिपोर्टर- यशवंत पाटेकर

शेवगाव 30 नोव्हेंबर 2021        अखेर भाऊसाहेब घनवट आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा.                        चिठ्ठीत नाव असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर नातेवाईक ठाम

शेवगाव तहसील कार्यालय समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत भाऊसाहेब घनवट (रा .नजीक बाभूळगाव) या तरुणाने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान भाऊसाहेब घनवट यांनी लिहिलेली आठ पाणी चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आपल्यावर कसा अन्याय झाला याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

या चिठ्ठीत नावे असलेल्या 3 जनावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चिठ्ठीत नाव असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या मध्ये गंगामाई साखर कारखान्यामध्ये नोकरी करणारे विष्णू खेडकर .अर्जुन मुखेकर . व जगन्नाथ रघुनाथ झाडे. यांची नावे आहेत मात्र नाव वगळलेला पोलीस अधिकारी कोण ? याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत .
नजीक बाभूळगाव येथील भाऊसाहेब उर्फ सोमनाथ सर्जेराव घनवट या तरुणाने शेवगाव तहसील कार्यालया समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास लक्षात आले पोलिसांनी मृतदेह खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. दरम्यान पंचनामा करताना मृतदेहाच्या खिशामध्ये आठ पाणी चिठ्ठी आढळून आली.

या चिठ्ठीत भाऊसाहेब घनवट याने आपण कोणत्या कारणाने आत्महत्या करत असून आपल्याला होणाऱ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी जीवनयात्रा संपवत आहोत. याचा स्पष्ट उल्लेख केलाआहे . या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या गंगामाई साखर कारखान्यात नोकरी करणारे विष्णू खेडकर. अर्जुन मुखेकर. व जगन्नाथ रघुनाथ झाडे . यांची नावे असल्याने यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या चिठ्ठीत नाव असलेला एक पोलिस अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करावा सोशल मीडियावर ठेवलेल्या सर्व काही मोबाईल मध्ये या टेटस असलेल्या मोबाईलची तपासणी करावी. अशी मागणी भाऊसाहेब घनवट यांच्या नातेवाइकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

यामुळे तणाव निर्माण झाला होता तणाव पाहता पोलिसांनी बंदोबस्तासाठी नगर येथून एका पथकाला पाचारण केले मात्र नातेवाईक रात्रीपर्यंत आपल्या मागणीवर ठाम होते .

मयत भाऊसाहेब घनवट .यांच्या पश्चात आई .भाऊ. पत्नी .एक छोटी मुलगी .असा परिवार आहे. भाऊसाहेब घनवट यांनी न्याय मिळवण्यासाठीच तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.