केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थी कल्याणचे संचालक प्रा. डॉ.महावीरसिंग चौहान यांनी केला सन्मान .
नामदार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री यांचे राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याणचे संचालक प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान यांच्याकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने स्वागतासह सत्कार.
दि.31 ऑगष्ट 2024 रोजी नामदार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या राहुरी दौ-या दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठांतर्गत चाललेल्या कला क्रिडासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमासंबधीची माहीती घेण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा योजनेचे तथा विद्यार्थी कल्याणचे संचालक प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान यांना बोलावण्यात आले होते. यावेळी ना. रक्षाताई खडसे यांनी कला क्रिडा व राष्ट्रीय सेवा योजने संबधी सर्व माहीती घेतल्यानंतर सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डाॅ प्रशांतकुमार पाटील यांच्यासह प्रा.डाॅ महावीरसिंग चौहान यांचे विषेश कौतूक केले.
विद्यापिठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककांद्वारे विविध सामाजिक उपक्रमांचे सर्वोत्कृष्ट कार्ये केल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापिठाला राज्यातील कृषी व अकृषी विद्यापिठातून 2023 चा सर्वोत्कृष्ट विद्यापिठ व डाॅ महावीरसिंग चौहान यांना स्वतः सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक तथा संचालक म्हणून राज्य पुरस्कार जाहीर झाल्याचे माहीत झाल्याने त्यांनी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरूंसह रा.से.योजना संचालक प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान यांचे अभिनंदनही केले. याप्रसंगी विद्यापिठाच्या वतीने प्रा.डाॅ महावीरसिंग चौहान व त्यांच्या पत्नी सौ.वैशाली चौहान यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन नामदार रक्षाताई खडसे यांचे स्वागत करून सत्कारही केला.