शेतकऱ्याची लय लूट मी कोणाला करून देणार नाही.-माजी मंत्री विजय शिवतारे

शेतकऱ्याची लय लूट मी कोणाला करून देणार नाही.-माजी मंत्री विजय शिवतारे

शेतकऱ्याची लय लूट मी कोणाला करून देणार नाही.-माजी मंत्री विजय शिवतारे नेवासा तालुक्यातील स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्री इंडस्ट्रीजच्या मीलच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री विजय शिवतारे बोलत होते ,नेवासा तालुक्यातील वरखेड-माळेवाडी येथे स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्री इंडस्ट्रीजच्या मिलचे उद्घाटन सरला बेट महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न .

        यावेळी बोलताना माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की मी या नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची लई लूट कोणाला करू देणार नाही तसेच ते बोलताना पुढे म्हणाले की जसे कर्मयोगी यांनी काम केले तसेच या नेवासा तालुक्यामध्ये काम करणार असून असे काम केले तरच समाज पुढे जातो त्यात विजय शिवतारे पुढे म्हणाले की बाहेरचा गेटकेन ऊस आणून पैसे कमवायचे धंदे मी करणार नाही व शेतकऱ्याची लूट मी होऊ देणार नाही तसेच या तालुक्यातील दहशत तुमची संपली व सर्व सामान्य लोकांसाठी मला या कारखान्याच्या माध्यमातून काम करायचे आहे. 

       तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की बारामती मध्ये मी सेटलमेंट करत नाही तर इथे कशी करणार तेवढा मी खमक्या आहे. कारखान्याचे चेअरमन सौ.डॉ.ममता शिवतारे लांडे यांना शिवतारे भाषणातून बोलताना सांगितले की कारखान्याच्या माध्यमातून देशातील दहा महिला आहेत त्या मध्ये तुझा नंबर लागला पाहिजे व मोठे उद्योगपती म्हणून एवढं नाव कमव असाही शुभ आशीर्वाद आपल्या भाषणातून कारखान्याच्या चेअरमन ममता ताई शिवतारे लांडे यांना विजय शिवतारे यांनी बोलताना दिला ..

                                         पुढे बोलताना कारखान्याचे चेअरमन ममता ताई शिवतारे लांडे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन मी हवी ती मेहनत घेणार असून तसेच ज्या गावांमध्ये महालक्ष्मीचा वास आहे त्या गावांमध्ये कारखान्याला समृद्धी व भरभराट मिळणार हे निश्चितच आहे तसेच आपल्या सर्वांचा प्रतिसाद विश्वास आहे की आपण एकत्र काम करून व भविष्यामध्ये अतिशय उत्तम कारखाना करू महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हा नंबर एकचा कारखाना आणू एवढ्या चांगल्या प्रकारे आम्ही काम करून दाखवू असा हा विश्वास आपल्या भाषणातून ममता ताई शिवतारे-लांडे यांनी बोलताना व्यक्त केला.....

 

  तसेच पुढे बोलताना तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की ज्यांनी ज्यांनी या कारखान्याला अडथळे आणले जे कोणी देव पाण्यात ठेवून बसले होते स्वामी समर्थ कारखाना हा होऊ नये त्यांना हे उद्घाटन प्रतिउत्तर आहे तसेच आपल्या उसाचा प्रश्न या कारखान्याच्या माध्यमातून मिटला असून तसेच बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की हा कारखाना सुरू होत असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे आपल्या भाषणातून बोलताना सांगितले.....    

 

  तसेच पुढे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले की वरखेड परिसराच्या जडणघडणीमध्ये भविष्य काळामध्ये या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे जे शेतकरी आहेत त्यांचा मोठा प्रश्न स्वामी समर्थ शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज च्या माध्यमातून सुटणार असल्याचे लंघे यांनी सांगितले कारखान्याच्या माध्यमातून अनेक व्यवसाय वरखेड परिसरामध्ये भविष्य काळामध्ये येणार असल्यामुळे येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन सुशिक्षित युवक उद्योजक बनेल असे बोलताना विठ्ठलरावजी लंघे यांनी आपल्या भाषणातून बोलताना भावना व्यक्त केल्या..... यावेळी मिल रोलरचे भूमिपूजन सरला बेटचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे आभार वीनस शिवतारे यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी मंचावरती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे , माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,अंकुश काळे, बाळासाहेब शिंदे , विश्वनाथ शिंदे, कृष्णा महाराज हारदे,अनिल मते प्रताप , अशोक हरदे,चिंधे ,भाऊसाहेब फुलारी पुरुषोत्तम सरजे, अंबादास कोरडे, विलास उंद्रे,संतोष काळे, सरपंच विनोद ढोकणे , कारखान्याचे चीफ इंजिनियर सोनवणे साहेब ,झोडगे मामा ,आदी मान्यवर तसेच नेवासा तालुक्यातील तसेच वरखेड परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.