दया‌.क्षमा.. शांती... पुस्तक ग्रंथास उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर. ..

दया‌.क्षमा.. शांती... पुस्तक ग्रंथास उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर. ..

                           श्रीरामपूर :- लेविन भोसले यांच्या दया, क्षमा, शांती या पुस्तक ग्रंथास वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये व कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी जाहीर केला.             

   लेविन भोसले यांचे या अगोदर विज्ञान जिज्ञासा, वेध सामाजिक जाणिवांचा, कानोसा समाज मनाचा हे पुस्तक प्रकाशित झाले आहेअसून त्यांनाही पुरस्कार मिळालेले आहे.यात २९२पृष्ठांमध्ये ९१ सामाजिक, धार्मिक, वैचारिक, शैक्षणिक लेख असून या ग्रंथास डॉ.शिवाजी काळे यांची प्रस्तावना, बिशप अंम्ब्रोज रिबेलो औरंगाबाद धर्म प्रांत यांचे आशीर्वाद व शुभसंदेश लाभलेला आहे.२३एप्रील रोजी जागतिक पुस्तक दिन वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा १८वा वर्धापनदिना निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येण्याचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद बाबुराव उपाध्ये यांनी माहिती दिली.                                        लेविन भोसले यांच्या दया, क्षमा, शांती या पुस्तक ग्रंथास उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेकांनी लेविन भोसले यांचे अभिनंदन केले आहे.