ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने घरकुल घोटाळा करून लाटले बोगस अनुदान, वरवंडी येथील घटनेने तालुक्यात खळबळ .
वरवंडी येथे घरकुल घोटाळा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांने लाटले बोगस अनुदान .
राहुरी तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी याने स्वःताचे घरकुल मंजुर करून घेतले मात्र प्रत्यक्षात घरकुल न बांधताच शासनाकडुन अनुदान लाटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे याबाबत समजलेली सविस्तर माहीती अशी की वरवंडी गावाला सन २०१७ ते २०२० या कालावधीत एकुन १० घरकुले मंजुर झाली घरकुल लाभार्थ्यांनी आपापल्या घराची कामे पूर्ण केली परंतु ग्राम पंचायत कर्मचारी आबासाहेब बन्सी भालेराव याने Administrative sanction No adm / drda / ramai / samation / rahuri , 2018111 dated 23 /03/2018 [ 2017-18 ] प्रमाणे मंजुर करून घेऊ न स्वताःचे घरकुलाचे बांधकाम न करता च अनुदान लाटले आहे अशी तक्रार वरवंडी ग्रामस्थ नारायण मैनाजी शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कडे केली असुन तक्रारीत म्हटले आहे की मी मला घरकुल मिळावे म्हणुन ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव सादर केला होता माझे नांव घरकुल यादीत आठरा नंबरवर असताना मला स्वःताची जागा नाही म्हणुन घरकुल मंजुर होणार नाही असे तोंडी सागण्यात आले म्हणुन मी गावात जागा खरेदी घेतली व घरकुल मंजुरीची वाट न पहाता स्वखर्चाने घराचे बांधकाम चालु केले परंतु ग्रामपंचायत कर्मचारी यांनि माझे घराचे वेळोवेळी फोटो काढुन पंचायत समीती राहुरी च्या संबंधीत विभागला पाठवून त्याचे घरकुलाचे बाधकाम न करता माझ्या घराच्या फोटोच्या आधारे शासनाचे अनुदान लाटले असुन माझी व शासनाची फसवणुक केली व मला घरकुल लाभापासुन वंचीत ठेवले सदर वरवंडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांने त्याचे मंजुर घरकुलावर माझ्या घराचे फोटो वापरून अनुदान लाटणारा कर्मचारी . तात्कालीन ग्रामसेवक सरपंच वरवंडी तसेच संबधीत घरकुल विभागाचे शाखा अभियंता तात्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती राहुरी यांची चौकशी होऊन दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी अशी तक्रार केली असुन सदर कारवाई न झाल्यास आपण पंचायत समिती राहुरी यांचे कार्यालया समोर उपोषणास बसु असा इशारा नारायण शिदे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे
सदर वरवंडी घरकुल घोटाळा प्रकरणी वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे वरवंडी ग्रामस्थां सह संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे