बजरंगदलाच्या आव्हानामुळे तीन लाख रुपयांच्या गोवंशाला जीवदान.

बजरंगदलाच्या आव्हानामुळे तीन लाख रुपयांच्या गोवंशाला जीवदान.
पत्रकार_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
साविस्तर_बजरंगदल लोणी शहर यांनी वेळोवेळी प्रबोधन करून, देशी गोवंश कत्तलीसाठी कसायांना न विकता, त्याचे जतन व संवर्धन करण्याची मोहीम सुरू केलीय, त्यामुळे लोणी व प्रवरापरिसरात अनेक शेतकऱ्यांनी बजरंगदलाशी सम्पर्क करून आपल्या कडे असलेले गोवंश कत्तली साठी न विकता मोफत बजरंग दल यांच्या मार्फत गोशाळेत सोडत आहेत.
परिस्थिती असेल तर किमान एक देशी गोवंशाचे संगोपन करा.
त्याच आव्हानाला प्रतिसाद देत आज दिनांक :- 15/03/2025 रोजी__शेतकरी प्रकाश भिकाजी वऱ्हाडे / प्रल्हाद भागवत विखे / प्रभाकर तुकाराम लहामगे / प्रताप रावसाहेब गागरे / नानासाहेब रावसाहेब गागरे या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कडील अंदाजे तीन लाख रुपये किंमतीचे गोवंश बजरंग दल लोणी यांच्याकडे दिले, व सर्व बजरंग दलाच्या बजरंगीनी त्यां गोवंशाला उज्वल गोरक्षण केंद्र मांची येथे सुखरूप पोहच केले.
बजरंग दल यांनी केलेल्या आजच्या मोहिमेतील गौसेवक.
बजरंगदल लोणी शहर अध्यक्ष_सागरभाऊ राक्षे, अर्जुनभाऊ लहामगे, सागरभाऊ उबाळे, प्रभाकर वऱ्हाडे, गणेश माळी, प्रशांत लहामगे, सुनील शेळके, अजित कानडे, ओम खवळे, रोहन गिरी, सनी राक्षे उपस्थित होते. यावेळी भारतीय दलीत महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष_हीना ताई उबाळे यांनी उपस्थित राहून सर्वांचे आभार व्यक्त केले.
गौ संगोपनासाठी महिन्याला लाखो रुपयांचा खर्च.
उज्वल गोरक्षण केंद्र मांची_यांच्याकडे शेकडो गोवंश आहेत, त्यांचे संगोपन करण्यासाठी मनुष्य बळ, चारा, डॉक्टर, औषधे यासाठी महिन्याला लाखो रुपयांचा खर्च येतो, त्यामुळे कोणाला आर्थिक स्वरूपात मदत करून गोसेवा करायची असल्यास त्यांनी संबधित नंबर वर संपर्क साधावा. सुमतीलाल गांधी - 9822296500.