शाळा व कॉलेज परिसरात छेडछाडीचे वाढते प्रकार; बजरंग दल व नागरिकांनी लोणी पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

शाळा व कॉलेज परिसरात छेडछाडीचे वाढते प्रकार; बजरंग दल व नागरिकांनी लोणी पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

शाळा व कॉलेज परिसरात छेडछाडीचे वाढते प्रकार; बजरंग दल व नागरिकांनी लोणी पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

प्रतिनिधी//प्रसाद घोगरे//9370328944.

दि. 19 जुलै 2025 | लोणी (ता. राहाता, जि. अहिल्यानगर)

प्रवरानगर व लोणी परिसरातील कन्या विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा व कॉलेज सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस छेडछाड, अश्लील टिपण्या व पाठलाग यासारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. काही युवक दुचाकीवरून जाणूनबुजून शाळा परिसरात फेरफटका मारत असून, त्यांच्या असभ्य वर्तनामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोणी हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. प्रवरा परिसरातील विविध गावांमधून शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी येतात. परंतु गेल्या काही काळात असामाजिक प्रवृत्तीच्या युवकांकडून होणाऱ्या त्रासामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचे जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख व लोणी शहर अध्यक्ष सागर राक्षे, भारतीय दलित महासंघाच्या अध्यक्षा हिना उबाळे, तसेच अनेक मान्यवर ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.

निवेदनात शाळा व कॉलेज सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस पोलीस गाडीमार्फत नियमित गस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली. तसेच, रोड रोमिओ, टवाळखोर व असामाजिक युवकांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवावा व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक नेमावे, अशी विनंती करण्यात आली.

"पोलिस प्रशासनाने तत्काळ पावले उचलून विद्यार्थिनींना सुरक्षित शिक्षणाचा हक्क मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे," असा विश्वास यावेळी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या वेळी उपस्थित:
विशाल चव्हाण, विकी राक्षे, मनोज साळवे, शुभम साळवे, सागर उबाळे, राधाकीसन आहेर, रोहित जोशी, विशाल आव्हाड, अमन शेख, अभिषेक वीर, प्रेम घोरपडे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.