बालाजी देडगाव येथे बजरंग दलाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.
*बालाजी देडगाव येथे बजरंग दल आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन.*
बालाजी देडगाव :-(प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मकर संक्रांति निमित्त बजरंग दल आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मकर संक्रांति निमित्त १७ वर्षापासून बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर चे आयोजन करण्यात येते . प्रमुख मान्यवरांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याही वर्षी या रक्तपेढीला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत सहभाग घेतला. यावेळी महिलांनीही पुढाकार घेत रक्तदान केले. यावेळी भरपूर रक्त पिशव्याचे संकलन करण्यात आले. बजरंग दलाच्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
यावेळी जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ. मढीकर यांच्या प्रयत्नाने शिबिर ठेवण्यात आले. तर डॉक्टर वसंतराव झेंडे सर यांनी रक्तदानाविषयी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे .तर रक्त हे माणसाच्या शरीरातूनच तयार होते. म्हणून सर्वांनी पुढे येत रक्तदान करावे व आरोग्य सुदृढ ठेवावे .असे अनमोल मार्गदर्शन करत बजरंग दलाचे मनापासून आभार मानले.
यावेळी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे, मा. चेअरमन बाबासाहेब मुंगसे, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच महादेव पुंड,पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके , बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य सौ. मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे, सौ. संगीताताई तिडके व आदी मान्यवर उपस्थित होते. तर जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ.शरद बळे डॉ. किरण शिंदे, डॉ. सुलभा पवळ ,डॉ.मनीषा जोशी, डॉ. मोहन शर्मा ,डॉ.किशोर यादव यांनी शिबिराचे नियोजन करत मोलाचे कष्ट घेतले.
बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे,उपाध्यक्ष शिवाजी काजळे व सर्व सदस्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन करत विशेष परिश्रम घेतले.