शिवप्रतिष्ठान संचलित शिवांकुर, शिवसृष्टी व शिवांकुर रेनबो स्कूल यांचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साहात.

शिवप्रतिष्ठान संचलित शिवांकुर, शिवसृष्टी व शिवांकुर रेनबो स्कूल यांचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साहात.

*शिव प्रतिष्ठान संचलित शिवांकुर, शिवसृष्टी व शिवांकुर रेनबो स्कूल यांचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साहात...*

              शिवप्रतिष्ठान संस्थेच्या तीनही विद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण दरवर्षीप्रमाणे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. 

              या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राहुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समितीच्या मा सदस्या डॉ सौ उषाताई तनपुरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रसिद्ध कवी, लेखक, गायक अष्टपैलू असे डॉ श्री महावीर सिंग चौहान हे होते. तसेच हा कार्यक्रम माजी प्रशासन अधिकारी, पुणेचे लक्ष्मणराव गुळवे तसेच बी वाय जगताप यांची प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व विश्वस्त, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

              कार्यक्रमासाठी संस्थेच्या प्रेरणास्थान असलेल्या श्रीमती इंद्रायणी पवार, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, ज्येष्ठ विश्वस्त भास्करराव पवार, उत्तमराव पवार, डॉ नरेंद्र इंगळे, खजिनदार डॉ किशोर पवार, सचिव डॉ प्रकाश पवार, युवराज पवार, मंगलताई पवार, ज्योतीताई शेळके, शिल्पा इंगळे तसेच पत्रकार बंडू म्हसे, अनिल कोळसे, कृष्णा गायकवाड, उद्योजक संदीप निबे, नारायण निमसे, बापूराव बाचकर, तुषार तमनर आदींसह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

                 शिवांकुर विद्यालयाचे नाव कायम ऐकत असताना 2015 साली शिवांकुर नावाने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज विस्तार होत असताना वटवृक्षात रुपांतर होत आहे हे पाहून एक राहुरी कर म्हणून मला अभिमान वाटत आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ चौहानसाहेब यांनी विद्यार्थ्यांसमोर पोवाडा, बालगीते, कविता सादर केल्या त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांकडून, पालकांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लक्ष्मणराव गुळवे, जी बी औटी सर, बी वाय जगताप आदींनी शाळेच्या उपक्रमांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या पारितोषिकांसाठी विद्यार्थ्यांचे व त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यालयास भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

                उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ पवार, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संकल्पनेतून तयार झालेले 'शिवपुष्प' या नियतकालिकाच्या पाचव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून विद्यार्थ्यांना उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी यामध्ये एकांकिका नाटक, गायन, वादन तसेच गाण्यांवरती डान्स सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका छाया जाधव यांनी तर अहवाल वाचन रोहिणी भाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शिंदे प्रियांका पांढरे व आभार डॉ. नरेंद्र इंगळे यांनी केले. 

             या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक अर्चना पाळंदे, शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे, शिवांकुर रेनबो विद्यालयाच्या कावेरी तनपुरे, रितू चाकोते, भुजाडी मॅडम, रूपाली मेहेत्रे तर शिवसृष्टीच्या उमा कारंडे, श्रद्धा सोनवणे आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.