सावनेर शहरात ईद जल्लोषात साजरी करण्यात आली

1.

सावनेर शहरात ईद जल्लोषात साजरी करण्यात आली !!!

सावनेर: रमजानच्या पवित्र महिन्यात जिथे मुस्लीम बांधव 1 महिना अखंड उपवास करून ईश्वराची(अल्लाह) आराधना करतात.मात्र या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव जकात, सदका देऊन अल्लाह ची आराधना (इबादत) करतात, आणि रमजानचा चंद्र पाहून रमजान ईदचीही आतुरतेने वाट पाहतात.

 दिनांक 3 मे रोजी संपूर्ण भारतात रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

यासोबतच महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात असलेल्या ईदगाह आणि मशिदीमध्ये रमजान ईदचा सण मोठ्या थाटामाटात आणि शांततेत साजरा करण्यात आला.

जामा मस्जिद सावनेर कमेटीतर्फे ईदगाह येथे ईदची नमाज अदा करण्यात आली.तसेच शाही मस्जिद-चिचपुरा येथे ही ईदची नमाज अत्यंत शांततेत अदा करण्यात आली.तसेच समाजातील हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये शांतता नांदावी असे नमाज मध्ये प्राथर्णा (दुआ) करण्यात आले.

यावेळी सावनेर शहर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल, अधिवक्ता पांडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बसवार, तसेच व्यापारी असोसिएशनचे सचिव मनोज बसवार व सावनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे, सामाजिक कार्यकर्ते व कृष्णा मेडिकलचे संचालक घटे व स्वप्नील पारवे यांच्यासह आमदार व पशुसंवर्धन दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाही मस्जिद कमिटी (चिचपुरा) –अध्यक्ष महबूब शाह व त्यांच्या समितीने मंत्री सुनील केदार यांचे स्वागत करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.तसेच सावनेर शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सावनेरचे ठाणेदार मारुती मूळक यांच्या नेतृत्वाखाली ईद निमित्त व धार्मिक कार्यक्रमाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.यासोबतच मस्जिद कमिटी व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यासोबतच नायाब तहसीलदार यांनी त्यांच्या पथकासह सावनेर तालुक्यातील सर्व मुस्लिम धार्मिक स्थळांना भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जामा मस्जिद सावनेर कमिटीच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.तसेच शाही मशीद कमिटी (चिचपुरा) च्या वतीने सर्व मुस्लिम बांधव व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शिरखुर्मा (शेवाईयुक्त अल्पोहार) ची व्यवस्था करण्यात आले.आणि रमजान ईदच्या शुभेच्छा ही देण्यात आले.

यावेळी शाही मशीद कमिटी (चिचपुरा) येथील नागरिक व स्थानिक मुस्लिम समाज आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .