*अक्षय तृतीयाच्या निमित्त्याने खंडाळा ते अंबाडा सोनक येथील ८५ गरजू व्यक्तींना अन्नधान्याची कीट वाटप*
काटोल:- माउंट कॉन्व्हेंट शाळा काटोल येथील शिक्षक कर्मचारी यांच्या पुढाकाराने खंडाळा व अंबाडा सोनक येथील ८५ कुटुंबाला अन्नधान्य किराणाची किट वाटप करण्यात आले.
यावेळी माउंट कॉन्व्हेंट शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन दिगंबर टुले,सहा. प्राध्यापक तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर, हेमेंद्र चरडे, उपसरपंच खंडाळा, राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य खंडाळा, अरविंदबाबु देशमुख महाविद्यालयचे डॉ. अमित गद्रे, आणि प्रा. प्रविण वसू यांनी परिश्रम घेतले.
खंडाळा गावातील कोविड १९ च्या काळात मरण पावलेले परिवार, गरिब परिवार, एकल परिवार, वृद्ध परिवार यांना मदत करण्यात आली. अंबाडा सोनक गावातील अपघातात आहत झालेले परिवार, एकल वृद्ध कुटुंब, कोविड १९ काळात मरण पावलेले परिवार दारिद्र रेषाखालील असणाऱ्या परिवारातील कुटुंबांना अन्नधान्य किट देण्यात आली.
या कार्याला पाहून अंबाडा सोनकचे सामाजिक कार्यकर्ता श्री. उमेशभाऊ टावरी, बालु गावंडे, सौ. अर्चना आहाके, सरपंच अंबाडा सोनक यांनी लाभार्थी परिवार निवड करताना. आणि वाटपासाठी मदतीस पुढाकार घेतला.माणुसकी मित्र परिवाराचे हर्षल खंडाते, गुड्डू खंडाते, दिक्षांत खंडाते, गौरव, रामकृष्णा टुले, जोत्सना टुले(मानकर), यांनी सहकार्य केले.