अवैधरित्या तलवार जवळ बाळगून दहशत करणाऱ्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या .

अवैधरित्या तलवार जवळ बाळगून दहशत करणाऱ्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या .

वैदुवाडी, अहमदनगर येथुन अवैधरित्या कब्जात तलवार बाळगुन दहशत करणारा इसम ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

 

              राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पो.नि. दिनेश आहेर, स्था.गु .शा. अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेशित केले होते .नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारा बाबत माहिती घेताना दिनांक 18/01/2024 रोजी पो.नी . दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे सनि शिंदे, रा. वैदुवाडी, अहमदनगर हा त्याचे कब्जात विनापरवाना धारदार तलवार घेवुन फिरत असुन आता गेल्यास मिळुन येईल.

 

            अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.नी . दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, पोना/भिमराज खर्से, पोकॉ/सागर ससाणे व जालिंदर माने अशांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन, बातमीतील संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने लागलीच वैदुवाडी, अहमदनगर येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णना प्रमाणे एक संशयीत इसम फिरतांना मिळुन आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतले. 

 

            ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सनि दुर्गाजी शिंदे वय 21, रा. वैदुवाडी, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 1,000/- रुपये किंमतीची 1 धारदार तलवार मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोहेकॉ/440 संदीप कचरु पवार ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 75/2024 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. 

 

            सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, हरीष खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.