दुध सेंटर चालकांकडून खाजगी सावकारकी जोमात, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून मनमानी भाव.

दूध दरामध्ये झालेली घसरण व त्यातच खाजगी सेंटर चालकांकडून उचली देऊन सावकारकी स्वरूपात शेतकऱ्यांना दबाव तंत्राचा अवलंब करून मनमानी भाव खाजगी सेंटर चालकांकडून काढण्यात येत आहे. सेंटर चालकांच्या सावकारकीच्या विळख्यात अडकलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल तो भाव पदरात पाडून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
सावकार किचा नवा फंडा दूध व्यवसायातून राजरोसपणे उदयाला येत असतानाही सरकारचे मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे .दूध उत्पादक शेतकरी सेंटरचालकांच्या सावकारकीच्या विळख्यात पक्का अडकला आहे.पशुखाद्य चे भाव गगनाला भिडले आहेत.मात्र दुधाला कवडीमोल भाव आहे . त्यातच दूध तपासणी करण्याच्या मशीनमध्ये होणारा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या गोष्टीकडे शासनाचा जाणीवपूर्वक डोळेझक सुरू आहे.अन्न व औषध प्रशासन फक्त भेसळीवर लक्ष देते.परंतु शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पशुपालन व दूध उत्पादनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा खळबळ जनक प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.तरी मंत्री महोदयांनी सदर गोष्टीकडे तातडीने लक्ष देऊन या सावकारकी व दबाव तंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटेला तात्काळ आळा घालावा. अशी मागणी जनतेतून होत आहे.