तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या विरुद्ध राहुरी पोलिसांची कारवाई .

तलवार हातात घेऊन दहशत करणाऱ्या विरुद्ध राहुरी पोलिसांची कारवाई .

** तलवार बाळगणा-या विरुध्द राहुरी पोलीसांची कारवाई**

 

              प्रस्तुत घटना अशी की, दि.24/03/2024 रोजी माननीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनिय माहीती मिळाली की,गंगापूर तालुका राहुरी परिसरात एक इसम हातात तलवार अवैधरित्या घेऊन दहशत करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशित केल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावून सदर इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्ट मध्ये पाठीमागील बाजूस कंबरेला असलेली तलवार ताब्यात घेऊन सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विठ्ठल अशोक जांभुळकर, वय 22 वर्षे, रा. गंगापूर ता. राहुरी जि.अहमदनगर असे असल्याचे सांगीतल्याने सदर इसमाविरुध्द राहुरी पोस्टे गुरंन 323/2024 शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        

             सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहमदनगर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ जायभाय, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, प्रमोद ढाकणे, गोवर्धन कदम, सतीश कुराडे, सचिन ताजने, रवी पवार, आदिनाथ पाखरे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर तसेच पोलीस नाईक संतोष दरेकर, सचिन धनाड नेमणूक मोबाईल सेल श्रीरामपूर यांनी केलेली आहे.