उपवास काळातील पवित्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री पवित्र क्रुसाची भक्ती करण्यासाठी कोपरगाव धर्मग्राम, श्रीरामपूर लोयोला सदन धर्मग्राम, नाशिक धर्मग्राम व आसपासच्या भागातील धार्मिक या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासू, श्रद्धावान भाविक प्रार्थनेसाठी गर्दी.
वैजापूर ( प्रतिनीधी ) - दि. २५/०३/२०२४ उपवास काळातील पवित्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी करुणा माता चर्च, वैजापूर येथील पवित्र क्रूस तीर्थक्षेत्री पवित्र क्रुसाची भक्ती करण्यासाठी कोपरगाव धर्मग्राम, श्रीरामपूर लोयोला सदन धर्मग्राम, नाशिक धर्मग्राम व आसपासच्या भागातील धार्मिक या ठिकाणी ख्रिस्ती विश्वासू, श्रद्धावान भाविक प्रार्थनेसाठी उपस्थित होते.
सध्या या उपवास काळात विविध ख्रिश्चन धर्मग्रामा मधून भाविक ग्रुपने येवून क्रुसाची वाट भक्तीभावाने करत आहेत. विशेष म्हणजे उपवास काळात आजपर्यंत प्रत्येक दिवशी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते व उपस्थितांना भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याला जसे सोईस्कर होईल तसे या पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र, वैजापूर या ठिकाणी पवित्र क्रूसाच्या वाटेची भक्ती करण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत अवश्य यावे. अशी सर्व भाविकांना विनंती केली आहे. प्रत्येक दिवशी वेळ सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत आहे. ( क्रुसाची वाट, मिस्सा, प्रवचन, आजारी भाविकांना पवित्र सांक्रमेंताचा आशिर्वाद व भोजन व्यवस्था ) अन्नदान व मदत करणा-या भाविकांचे आभार, परमेश्वराने त्यांना आशिर्वादीत करावे यासाठी प्रार्थना केली. आपल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी स्वागत असे वैजापूर चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर संजय ब्राह्मणे आमच्या प्रतिनिधीशी माहिती देतांना बोलले.