खड्डा चुकविण्याच्या नादात नगर मनमाड रस्त्यावर पुन्हा एक अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही .

खड्डा चुकविण्याच्या नादात नगर मनमाड रस्त्यावर पुन्हा एक अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही .

खड्डा चुकविण्याच्या नादात नगर मनमाड रस्त्यावर पुन्हा एक अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही .                           

          नगर मनमाड रस्त्यावरचे अपघातांची मालिका सुरूच आहे .समजलेल्या माहितीनुसार 13 / 9 / 2025 रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुळा पाटबंधारे उजवा कॅनल जवळ नगरच्या दिशेने जात असलेल्या महिंद्रा पिकप मालवाहतूक गाडी खड्डा चुकविण्याच्या नादात व दुचाकी वाहनांना वाचविण्यासाठी जोरात मोठ्या खड्ड्यात गाडी आदळल्याने गाडी पलटी झाली .                                  

       सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही .अजूनही नगर मनमाड रस्त्यावरती अवजड वाहतूक चालू असून शासन आदेशाचे पालन अवजड वाहन चालक करताना दिसत नाही . या वाहनांना परवानगी कोण देत ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे . नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहतूकिकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का ? त्यांच्या आशिर्वादानेच अवजड वाहने अजूनही या रस्त्याने ये जा करत आहे का ? या सर्व प्रकारावरून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .