वीर सह्याद्री ट्रेकर्स च्या मावळ्यांचा आणखी एक ट्रेकिंग चा थरार

1 / 1

1.

प्रतिनिधी दि -३० सध्या तरुणांकडून वेगवेगळे ट्रेकिंग करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणजे वीर सह्याद्री ट्रेकर्स च्या मावळ्यांनी सह्याद्री च्या पर्वत रांगा मधील अत्यंत कठीण श्रेणी मध्ये असलेला म्हणजेच ४४०० फुट उंच असलेला नाशिक जिल्ह्यातील किल्ले औंढा आणी किल्ले पट्टा गड उर्फ विश्रामगड हे दोन्ही गड एकाच दिवसात सर केले.वीर सह्याद्री ट्रेकर्स च्या या मोहिमेत एकुण १७ जणांनी सहभाग घेतला होता.या किल्यांच्या सभोवताली असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे.अशी ही भटकंती वीर सहयाद्री ट्रेकर्स च्या वतीने यशस्वी रित्या पार पाडण्यात आली त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.