स्वाभिमानी महिला ग्रामसंघ व बचत गट पानेगाव यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहास अकरा हजार रुपयांची देणगी.

स्वाभिमानी महिला ग्रामसंघ  व बचत गट पानेगाव यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहास अकरा हजार रुपयांची देणगी.

प्रतिनिधी;-खेडले परमानंद, नेवासा

    परिपूर्ण व नियोजन बद्ध आर्थिक व्यवहाराचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे स्वाभिमानी महिला ग्रामसंघ  व बचत गट पानेगाव

      या बचत गटाच्या महिलांनी आपल्या नियोजनबद्ध आर्थिक व्यवहाराच्या व कुशलतेच्या जीवावर मिळालेल्या यशाचे प्रतीक सांगणारे कर्तुत्व केलेले आहे. या महिला भगिनींनी गावातील अखंड हरिनाम सप्ताह साठी अकरा हजार रुपयाची देणगी सुपूर्द केलेली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामस्थ व पंचक्रोशीतून त्यांचे कौतुक होत आहे

        कोरोणाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर अखंड हरिनाम सप्ताह साठी सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे

       महिला बचत गटाच्या या कार्याबद्दल सप्ताह कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने वेदांताचार्य ह .भ. प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री ज्ञान योग आश्रम डोंगरगण यांच्या हस्ते या महिला गटातील भगिनींचा  श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला

       यामध्ये बचत गटाच्या सी.आर.पी मंगल अंकुश गुडधे, बँक सखी ज्योती गोविंद गायकवाड,

ग्रामसंघ अध्यक्षा गीता अमित जंगले,

सचिव अनिता दिलीप गुडधे, कोषाध्यक्ष लंका संभाजी शेंडगे

व इतर सहकारी महिलांचा सन्मान करण्यात आला.  ...