पिप्री अवघड ग्रामंचायत प्रमाणे तालुक्यातील ईतर ग्रा पं अपंग निधी वाटप करावे=सुरेशराव लाबे पाटील
राहुरी प्रतीनिधी-दिव्याग अपंगांचे दैवत प्रहार जनशक्ती पक्षाचे अद्यप्रवर्तक मा राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या अथक प्रयत्नातुन संपुर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत उत्पनाच्या पाच टक्के निधी प्रत्येक वर्षी गावातील अपंगाना वाटप करण्याचे परीपत्रक काढुन वाटप करण्याचे आदेश संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व व ग्रामपंचायतींना देण्यात आला त्या प्रमाणे आज पिंपरी अवघड मध्ये असलेल्या सर्व दिव्यांग अपंग व्यक्तींना चेकद्वारे रक्कम देण्यात आली व संसार उपयोगी वस्तूचे वाटप करून सर्व अपंगांना आधार देण्याचे काम पिंपरी अवघड ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रामसेवक व काही नागरिक यांच्या उपस्थितीत पिंपरी अवघड चे माजी सरपंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
यावेळी लांबे यांनी मनोगत व्यक्त करताना पिंपरी अवघड ग्रामपंचायत प्रमाणे राहुरी तालुका व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील संपूर्ण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीने पाच टक्के अपंग निधी वाटप करून अपंग व्यक्तींना आधार द्यावा व शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून द्यावा व ज्या अपंग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंगत्वाचा दाखला प्रमाणपत्र मिळाले नसेल त्यांनी ते त्वरित काढण्यासाठी संपर्क करावा त्यांना माननीय बच्चुभाऊ कडू यांनी स्थापन केलेल्या दिव्यांग अपंग संघटना या पदाधिकाऱ्यां मार्फत मदत केली जाईल असे आव्हान उपस्थित पिंपरी अवघड गावातील अपंग व्यक्तींना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी मार्गदर्शन केले
यावेळी पिंपरी अवघड च्या सरपंच सौ रेखा बापू पटारे उपसरपंच लहानुभाऊ तमनर सदस्य अमोल गायकवाड,परविनबानो शेख,शिवाजी लांबे,शरद लांबे,विनोद बर्डे, माजी सरपंच लिंबाहरी बाचकर,व वसंतराव लांबे, एकनाथ लांबे ,ग्रामसेवक चोखर मॅडम,कृष्णा कांबळे,संजय वाघमारे,तसेच धोंडीराम पवार मंजूरभाई शेख, जगधने भाऊ,फकीरा लांबे,राधुजी बाचकर, रमजान शेख,दगडु टेलर शेख,अशी अनेक नागरिक व अपंग बांधव उपस्थित होते