दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ - खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ - खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश
| प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अधिकचा वेळ शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा राज्य मंडळाने गेल्या वर्षीच्या सवलती रद्द केल्या. कॉफी मुक्त अभियानांतर्गत परीक्षा दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी दिली जाणारी दहा मिनिटे रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. राज्य मंडळाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी,पालक व शिक्षक संघटनांकडून नाराजीचा सुर उमटला. यासाठी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना पत्र लिहून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवण्याची मागणी केली. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात आली आहेत. राज्य मंडळाने सुधारित वेळेचे प्रकटन पत्र प्रसारित केले आहे.
पिंपळगाव तुर्क तालुका पारनेर येथील शिक्षक भानुदास शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.