बालाजी देडगाव येथे ऊद्या पासून योग व प्राणायाम शिबिरास सुरवात शेकडो महिला व पुरुष होणार सहभागी.
प्रतिनिधी (बालाजी देडगाव)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कै . ग .भा. विठाबाई मोहन तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांची मुले नेवासा खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ मोहन तांबे, शिवाजी मोहन तांबे, नवनाथ मोहन तांबे व विष्णू मोहन तांबे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ श्री .क्षेत्र बालाजी मंदिर येथे ऊद्या दिं. 17 /2/ 2023 पासून सकाळी 6 ते 7 या वेळेत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन केले असून, त्याचे उद्घाटन ऊद्या सकाळी करण्यात येणार आहे .
उद्यापासून होणाऱ्या योग व प्राणायाम शिबिरांमध्ये देडगाव व परिसरातील शेकडो लोक सहभागी होणार असून, जगभरात योगा व प्राणायाम चे शिबिर आयोजित होतात . परंतू ग्रामीण भागात या शिबिराचा लोकांना लाभ व्हावा. म्हणुन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व आपलं आरोग्य उत्तम, सुदृढ, निरोगी राहावे म्हणून आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे .या शिबिरासाठी श्री दिगंबर रिंगे जेऊर है., श्री सोमनाथ चव्हाण नेवासा फाटा व श्री विष्णू तांबे देडगाव हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असणार असून योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. तरी या योगा व प्राणायाम शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विष्णू मोहन यांनी केले आहे.
या शिबिरास नेवासा तालुक्याचे माजी उपसभापती कारभारी चेडे ,विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर , ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे ,
विद्यमान संचालक जनाार्दन कदम, मा. दत्ता पाटील मुंगसे,सोसायटीचे चेअरमन महेश कदम, व्हॉईस चेअरमन रामभाऊ कोकरे ,माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे , सचिव रामानंद मुंगसे,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, युनूस पठाण, व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे , महीला, तरुण, वयोवृद्ध अशी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.