छत्रपतींच्या मुर्तीची विटंबना प्रकरणाचा छडा न लागल्याने राहुरीकरांची खंत ; पोलीस अधीक्षकांकडे मांडली व्यथा .

छत्रपतींच्या मुर्तीची विटंबना प्रकरणाचा छडा न लागल्याने राहुरीकरांची खंत ; पोलीस अधीक्षकांकडे मांडली व्यथा .

​ छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना प्रकरणाचा छडा न लागल्याने राहुरीकरांची खंत; पोलीस अधीक्षकांकडे मांडली व्यथा

​ऑपरेशन मुस्कानचे कौतुक; मात्र १० महिने उलटूनही आरोपी अद्याप मोकाटच

​           अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिवारी (दि. २४) राहुरी पोलीस स्टेशनला वार्षिक कार्यालयीन आढावा घेण्यासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान राहुरी व्यापारी असोसिएशन आणि शहरातील प्रमुख नागरिकांनी त्यांची भेट घेऊन विविध समस्यांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना होऊन दहा महिने उलटले, तरी अद्याप आरोपींचा शोध न लागल्याबद्दल नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तीव्र खंत व्यक्त केली.

​          याप्रसंगी राहुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे मा.अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, बाळासाहेब उंडे, दीपक मुथा, ॲड. संतोष आळंदे, संजीव उदावंत, सूर्यकांत भुजाडी, नवनीत दरक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​'ऑपरेशन मुस्कान'चे कौतुक

​           राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या पथकाने 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत हरवलेल्या १०० मुलींची घरवापसी करून दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे अवघड गुन्हे मार्गी लागतात, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

*विटंबना प्रकरणावरून तीव्र भावना*

           ​एकीकडे मुलींचा शोध घेण्यास यश मिळत असताना, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या नराधमांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. "दहा महिने उलटूनही आरोपींचा सुगावा लागत नसल्याने तालुक्यातील जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या घटनेतील आरोपींचा तात्काळ छडा लावून त्यांना कठोर शिक्षा व्हावी," अशा घटनेमुळे राहुरी शहरासह तालुक्याचा सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम केले जात आहे त्यामुळे तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली.*

 

​         राहुरी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर आरोपींचा शोध लवकर लागला असता. त्यामुळे गृहखात्याकडे कॅमेरे बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पत्र पाठवावे. नगर-शिर्डी महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतुकीमुळे मोठी कोंडी होत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्यामुळे या महामार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात यावी.

​         पोलीस बळ वाढवा: राहुरी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी.​यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि प्रलंबित तपासाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.