माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विचारांची निष्ठा सर्वसामन्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न- आ. कानडे , उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय चाचणी व उपचार शिबिर संपन्न

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या विचारांची निष्ठा सर्वसामन्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न- आ. कानडे ,  उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी  वैद्यकीय चाचणी व उपचार शिबिर संपन्न

श्रीरामपूर - तळागाळातील माणसांपर्यंत जाऊन त्यांना मदत करणे हा विचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांवर उपचार करुन त्यांच्या वेदना कमी करने त्यांना आधार देने या श्री. थोरात यांच्या विचारांची निष्ठा सर्वसामन्यांपर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले. 

लोकहक्क फाउंडेशन, चैतन्य हॉस्पिटल अहमदनगर, आय एम ए, उपजिल्हा रुग्णालय यांच्या वतीने राज्याच्या विधिमंडळाचे गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग मुलांसाठी आयोजित केलेल्या  वैद्यकीय चाचणी  व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आ. कानडे बोलत होते.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव डॉ. वंदना मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, नँब संस्थेचे अध्यक्ष अँड. भागचंद चुडीवाल, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे, डॉ. मयूर कापसे, माजी नगरसेवक कलीम कुरेशी, मुख्तार शहा, सरपंच किशोर बनकर, सागर मुठे, शितल पठारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, श्री. थोरात काँग्रेसचे तसेच विधानमंडळातील ज्येष्ठ नेते तसेच सलग आठ वेळा वाढत्या मताधिक्याने निवडून आलेले नेते आहेत. सुसंस्कृत, संयमी व संघर्ष करणारा नेता असलेले श्री. थोरात यांच्याकडे राज्याला पुढे घेऊन जाण्याची दूरदृष्टी आहे. पुढील काळात त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी काँग्रेस जणांची अपेक्षा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम होतात. समाजात सर्वात विकलांग घटक दिव्यांग आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के म्हणजेच सुमारे तीन कोटी जनता दिव्यांग आहे. त्यांच्याविषयी गांभीर्य नसल्याने राज्य सरकारचे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. दिव्यांग मुले उद्याचे भविष्य आहेत. त्यांच्या व्यंगाव्यतिरिक्त ते इतरही व्याधीमुक्त व्हावेत म्हणून या मुलांची सर्वांगीण वैद्यकीय चाचणी  व उपचार करण्याचे आपण जाणीवपूर्वक ठरवुन या शिबिराचे आयोजन केल्याचे आ. कानडे म्हणाले.

श्री. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गुणवंत प्रज्ञावंत यांचा गुणगौरव करण्यात येतो तो यावर्षीही करणार असून इतरही काही करता येईल का या हेतूने शिबिर घेण्यात आले. शिबिरात मुलांची तपासणी करून उपचार करण्याची गरज असल्यास तीही करण्यात येणार आहे, असे सांगून आ. कानडे यांनी जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश बंड, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, आय एम ए चे डॉ. रविंद्र कुटे व सर्व पदाधिकारी, अंधशाळा शाळेचे अध्यक्ष श्री. चुडीवाल व मूकबधिर शाळेचे चेअरमन सुरेश बनकर,संजय साळवे तसेच शाळेतील मुलांसाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करुन  दिल्याबद्दल  समता न्याती इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख राकेश न्याती यांचे विशेष आभार मानले. 

यावेळी आ. कानडे यांनी शिबिराचा आगळावेगळा उपक्रम राबविल्याचे सचिन गुजर, अरुण पाटील नाईक, डॉ. वंदना मुरकुटे, डॉ. कुटे यावेळी म्हणाले. शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड तसेच डॉ. रवींद्र कुटे, डॉ. अक्षय शिरसाठ, डॉ. वैभव जासूद, डॉ. श्वेता पुंड, डॉ. मयूर कापसे, डॉ. मोहन शिंदे, डॉ. मयुरेश कुटे यांच्यासह डॉक्टरांनी दिव्यांग मुलाची तपासणी केली. 

यावेळी संजय साळवे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, कार्लस साठे, सुरेश पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र कोकणे, प्रताप देवरे, दीपक कदम, रमेश उंडे, अमोल आदिक, राजेंद्र औताडे, डॉ. नितिन आसने, अँड़ सुभाष जंगले, अजिंक्य उंडे, अनिल ढोकचौळे, चंद्रसेन लांडे, अर्जुन राऊत, आशिष शिंदे, निखिल कांबळे, प्रतीक कांबळे, युनुस शेख, दिगंबर शिंदे, माणिकराव देसाई, अन्नासाहेब मुठे, शिवाजी पवार,  प्रताप देसाई, अप्पा ढोकचौळे, भाऊसाहेब पडोळे, हरिश्चंद्र बांद्रे, आदिसह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

............