श्रीगोंदा येथील टेम्पो चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने 50,000/- रू . रोख रकमेसह केले जेरबंद .

श्रीगोंदा येथील टेम्पो चालकास तलवारीचा धाक दाखवून लुटणाऱ्या 5 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने 50,000/- रू . रोख रकमेसह केले जेरबंद .

 

काष्टी रोड, श्रीगोंदा येथील टेम्पो चालकास तलवारीचा धाक दाखवुन, लुटणारे ५ आरोपी ५०,०००/- रुपये रोख रकमेसह जेरबंद.

स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व श्रीगोंदा पोलीसांची संयुक्त कारवाई.

 

        

             प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ३०/०१/२४ रोजी फिर्यादी श्री. निलेश नामदेव जाधव, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा हे साथीदारासह टेम्पो घेवुन जाताना पाठीमागुन विनानंबर २ मोटार सायकलवर अनोळखी ६ इसम येवुन टेम्पोला मोटार सायकल आडवी लावुन, तलवारीचा धाक दाखवुन, मारहाण करुन १,५४,०००/- रुपये रोख रक्कम दरोडा घालुन चोरुन घेवुन गेले बाबत श्रीगोंदा पो.स्टे. गु.र.नं. ९०/२०२४ भादविक ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

           सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पो .नि. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न, त्यांना अटक करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पो .नि. दिनेश आहेर यांनी दिनांक ०६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / हेमंत थोरात, अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ / अर्जुन बडे अशांचे पथक नेमुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. 

 

           पथक श्रीगोंदा परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पो .नि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद प्रमाणे गुन्हे करणारे इसम नामे सत्यवान जाधव व गौरव नाळे दोन्ही रा. अजनुज, ता. श्रीगोंदा यांनी केला असुन ते अजनुज गांवात फिरत आहेत व आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो . नि. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, पंच व सोबतचा स्टाफ घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावून खात्री करुन आवश्यक कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.वरील पथकाने लागलीच अजनुज, ता. श्रीगोंदा येथे जावुन खात्री केली असता सदर गांवात संशयीत नामे सत्यवान जाधव व गौरव नाळे यांचे वास्तव्याबाबत माहिती मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

 

              ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सत्यवान दादा जाधव वय २२ व २) गौरव महादेव नाळे वय २३ दोन्ही रा. अजनुज, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नमुद दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे शुभम क्षिरसागर रा. अजनुज, ता. श्रीगोंदा, अरबाज सय्यद व सलीम बेग दोन्ही रा. आनंदवाडी, ता. श्रीगोंदा यांचेसह वरील प्रमाणे गुन्हा केल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे साथीदारांचा आरोपींकडील चौकशीत प्राप्त माहिती वरुन शोध घेता आरोपी नामे ३) शुभम सुदाम क्षिरसागर, रा. अजनुज, ता. श्रीगोंदा हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले.

 

         पथकाने श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोसई / समीर अभंग, अंमलदार गोकुळ इंगवले, प्रताप देवकाते, संभाजी गर्जे यांना मदतीस घेवुन आरोपींचे इतर साथीदारांचा एकत्रित शोध घेता आरोपी नामे ४) अरबाज बशीर सय्यद व ५) सलीम शब्बीर बेग दोन्ही रा. आनंदवाडी, ता. श्रीगोंदा हे आनंदवाडी, ता. श्रीगोंदा शिवारात मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व आरोपींकडे गुन्ह्यातील गेले मालाबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यातील गेले मालापैकी ५०,०००/- रुपये रोख रकमेसह ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.

 

           आरोपी नामे अरबाज बशीर सय्यद हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे २४०/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा ०१ गुन्हा दाखल आहे.तसेच आरोपी नामे सलीम शब्बीर बेग हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे ९५७/२०२२ भादविक २७९ प्रमाणे चोरीचा ०१ गुन्हा दाखल आहे.

 

        सदर कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर व प्रशांत खैरे , अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व  विवेकानंद वाखारे, पोलीस उपअधीक्षक कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.