बालाजी देडगाव येथे शनि सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

बालाजी देडगाव येथे शनि सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

*बालाजी देडगाव येथे शनी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.*

नेवासा तालुका ( प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जागृत शनि देवस्थान असून दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी शनी उत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने आनंदात साजरा केला जातो.

     आदल्या दिवशी गंगेचे पाणी कावडी द्वारे आणून शनि देवाच्या मूर्तीला स्नान घालून स्वच्छ करत पवित्र केले जाते. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये या कावडीचे स्वागत केले जाते.तर पाडव्याच्या दिवशी सकाळी वेद मंत्राच्या साह्याने मोठा अभिषेक घातला जातो .यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते .त्या निमित्ताने अन्नदानाचेही आयोजन करण्यात आले होते.

    शनि देवाचा चौथारा हा अतिशय पुरातन हजारो वर्षांपूर्वीचा असून प्राचीन दगडी अवशेषे तेथे आहे. अतिशय जुने शनि देवाचा चौथारा असून समोरच प्राचीन काळातील भगवान शंकराची पिंड वेगळ्या अवस्थेत आहे. त्या ठिकाणी एक चमत्कारिक बाब म्हणजे जुन्या ज्या मोठाल्या दगडी शिळा आहेत त्या ठिकाणी त्या शेळीचा वेगळा ठण ठण ठण असा आवाज येतो. सर्वसाधारण दगडाचा असा आवाज येत नाही. हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. तर अन्य मंदिराच्या ठिकाणी नंदीच्या तुलनेत या ठिकाणच्या नंदी चे रूप वेगळे बघायला मिळते .हजारो वर्षांपूर्वीची या मुर्त्या असून. अशा मुर्त्या कुठेही पाहण्यास मिळत नाही. हे या परिसराचे वैभव आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर शांतता मन प्रसन्नता व शांती मिळते म्हणून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

      यावर्षी पाडव्यानिमित्ताने केलेला हा शनी सोहळा एक आगळावेगळा सोहळा ठरला असून परिसरातून या सोहळ्याचे कौतुक होत आहे.