अहिल्याबाई होळकर शाळेत शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण.

अहिल्याबाई होळकर शाळेत शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले वृक्षारोपण.

बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गुणवत्ता, संस्कार, संस्कृती जपणारी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये आदर्श संस्था शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने

वृक्षारोपण करण्यात आले.

         शिवनेरी प्रतिष्ठान ही आदर्श संस्था असून एकनाथ हनुमंत फुलारी यांच्या मार्गदर्शनाने परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवली जातात .धार्मिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा ,साहित्यिक क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करणारे शिवनेरी प्रतिष्ठान यांनी आत्ताच शाळेमध्ये पाच हजार रुपये( 5,000)किमतीचे झाडी आणून शाळेच्या परिसरातील शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारची झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल देडगाव परिसरातून शिवनेरी प्रतिष्ठानचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

         या वृक्षारोपण प्रसंगी मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य शिक्षणभूषण बाजीराव पाटील मुंगसे ( अण्णा), अहिल्याबाई होळकर शाळेचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, व सर्व शिक्षक वृंद , पत्रकार युनूस पठाण ,युवा नेते शिवम कुटे, महेश चेडे ,हिरामण पुलारी ,म्हातारदेव कोकरे ,नितीन ससाणे, विनोद तांबे, आंबादास रणदिवे सर, रोहित फुलारी, अजय फुलारी, प्रतिक दळवी, बाबासाहेब फुलारी , आदी मान्यवर व शिवनेरी प्रतिष्ठान चे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.