केंद्र सरकारने त्वरीत कांदा निर्यात बंदी उठवावी , केंद्रिय पथकास निवेदन

पारनेर  : राज्यातिल कांद्याची पाहणी करन्यासाठी केंद्रिय अधिकारीयांचे पथक 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र दौरावर आहे , हे पथक मंगळवारी 6 तारखेला बीड जिल्ह्यतील कांदा पाहणी करुण नगर मुक्कामी आले होते . हि महिती शेतकरी नेते श्री प्रसाद खामकर याना कृषी मंत्रालय , दिल्ली  येथुन प्राप्त झाली ,

श्री खामकर यानी पारनेर तसेच श्रोगोंदा तालुक्यातिल कांदा उत्पादक शेतकरी यांच्या समवेत केंद्रिय पथकाची सरकारी गेस्ट हाऊस  नगर येथे भेट घेतली आणि पारनेर आणि श्रीगोंदा कांदा उत्पादक शेतकरी  यांच्या वतिने कांदा निर्यात बंदी उठवन्याबाबत निवेदन दिले .

देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने मागील काही दिवसापासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. सर्वात जास्त कांद्या उत्पादक महाराष्ट्रात असून येथे चांगल्या पध्दतीने कांदा उत्पादन होते. असे असतांनाही  शेतक-यावर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अतिवृष्टमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यात बंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या काद्यांला परदेशी वारीसाठी मुक्त केले पाहिजे. केंद्र सरकारने याबाबात लक्ष घालून  तात्काळ निर्यात खुली करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . या पथका मध्ये ग्राहक कल्याण मंत्रालयायाचे संचालक आयइएस श्री सुभाषचंद्र मीना , कृषी मंत्रालयाचे उपसंचालक  आयइएस श्री पंकज कुमार आणि अवर सचिव श्री मनोज के. यांचा समावेश होता.