राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे हृदयविकाराने निधन
नेवासा (प्रतिनिधी युनूस पठाण) – राहुरी मतदारसंघाचे आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री. शिवाजी भानुदास कर्डिले.(वय ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली** आहे.
शिवाजी कर्डिले यांनी दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहून मतदारसंघाच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसंपर्कक्षमतेमुळे ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजलीचा ओघ सुरू झाला आहे.








