रा. से. यो .अंतर्गत मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त वरवंडी,खडकवाडीत वृक्षारोपण व वसुधा वंदन कार्यक्रम संपन्न.
*रा.से.यो.अंतर्गत मेरी माटी मेरा देश कार्यक्रमात देशाच्या अमृतमहोत्सवानिमित्त वरवंडी, खडकवाडीत वृक्षारोपण व वसुधा वंदन कार्यक्रम संपन्न*
*राहुरी विद्यापीठ,दि. 7 ऑगस्ट, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण कार्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनातून डॉ. महावीरसिंग चौहान तसेच वरवंडी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री.भाऊसाहेब कोळेकर व डॉ. कैलास कांबळे यांच्या अथक परिश्रमातून सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा व वसुधा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी शेतकरी बांधवांना आंब्याची रोपे देऊन व आपापल्या शेतामध्ये वृक्षारोपण करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
झाडे लावा परंतु झाडे जगवा व देशाच्या पंच्याहत्तर वर्षपूर्तीमध्ये कृषि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने, मार्गदर्शनातून शेतीत दुप्पट उत्पन्न वाढवण्याबाबत डॉ. दिलीप पवार यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. डॉ. कैलास कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केंद्र सरकार राबवित असलेल्या मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. सरपंच श्री. भाऊसाहेब कोळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. महावीरसिंग चौहान, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण यांनी उपस्थित शेतकर्यांसह उपस्थित अधिकारी, कर्मचार्यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. अतुल अत्रे, डॉ. विरेंद्र बारई हे उपस्थित होते.