*चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले नाही*

" चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले नाही "

BPS live प्रतिनिधी सुनील सोमकुंवर
नागपूर:-खापरखेडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिनियमा नियमाप्रमाणे शाळा, महाविद्यालय, गावाच्या दिशनिर्देशासाठी महामार्गावर सर्व्हिस रोड, सूचना फलक, कठडे लावने अनिवार्य आहे शिवाय रिप्लेक्टर, स्पिड ब्रेकर, ड्रेन, पथदिवे आदि लावने अनिवार्य आहे मात्र भानेगाव उड्डाणपूल ते दहेगाव (रं) या परिसरात अनेक समस्या तळ ठोकून आहेत त्यामूळे आरपीआय भानेगाव शाखा संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्याचे निश्चित केले यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ईतर विभागाला देण्यात आले.
या अनुषंगाने खापरखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी पुढाकार घेऊन १४ फेब्रुवारी सोमवारला चर्चे करिता आमंत्रित केले होते.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश ठाकरे, शाखा अभियंता किरण मुन, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, सावनेर पंचायत समितीच्या सभापती अरुणाताई शिंदे व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी, चक्काजाम आंदोलनाचे मुख्य संयोजक सुमेध चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, सभापती अरुणाताई शिंदे, सावनेर पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी, सरपंच रविंद्र चिखले, आरपीआयचे नेते पृथ्वीराज बोरकर, पृथ्वीराज बागडे, राहूल बागडे, पत्रकार दिवाकर घेर, सुनील जालंदर, मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, दिपक निगोटे, सामाजिक कार्यकर्ता मुकेश बागडे, भारतीय जनता पक्षाचे श्यामराव सरोदे, सचिन नागरकर, आशिष फुटाणे, ग्रा.पं. सदस्य निलेश घोरमाडे, विश्व हिंदू परिषदेचे योगेश जालंदर,  ग्रामविकास अधिकारी विजय लंगडे, व आरपीआय संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भानेगाव पारशिवनी टी पॉईंट ते मिलन चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या.

मात्र खापरखेडा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. आंदोलन कर्त्यांनी यावेळी शाळा महाविद्यालय परिसरात सूचना फलक, स्पीड ब्रेकर, कठडे  व भानेगाव उड्डाणपूल परिसरातील पथदिवे, पारशिवनी परिसरातील ड्रेन, दिशानिर्देश आणि यापलीकडे जाऊन पारशिवणी टी पॉईंट ते दहेगाव (रं) येथील पथदिवे सुरू करने व देखभाल दुरुस्तीची मागणी रेटून धरली.

राष्ट्रीय महामार्गावरील किरकोळ कामे त्वरित करण्यात यावी व उर्वरित कामाचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे मंजुरीसाठी पाठवावी   व लिखित आश्वासन देण्यात यावे यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दोन-तीन दिवसाचा वेळ देण्यात आला मात्र चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले नाही.

राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दोन दिवसात कळविणार असल्याचे आश्वासन दिले मात्र त्यांचे लिखित आश्वासन मिळाले नाही.
लिखित आश्वासन मिळाल्यावर चक्काजाम आंदोलन करने किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येणार असून आश्वासन मिळाल्यावर चक्काजाम आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे.