फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा ४१ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा ४१ वा  वर्धापनदिन उत्साहात साजरा
फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्चचा ४१ वा  वर्धापनदिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर - येथील फेथ गोस्पेल सेंटर ए जी चर्च,आदर्शनगर,वार्ड नंबर-१श्रीरामपूर या चर्चचा ४१ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेव्ह.योसेफ वडागळे,प्रिसबिटर, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काँसिल ऑफ  ऑफ साउथ इंडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहरातील विविध मान्यवर उपस्थि होते,चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह विजय केदारी यांनी प्रास्ताविक केले,त्यांनी आपले प्रास्ताविकात चर्चची माहिती देताना सांगितले की,सदर चर्चची स्थापना 1983 साली करण्यात आली, महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काँसिल ऑफ साउथ इंडिया या संस्थेच्या वतीने हे चर्चचालविले जाते,चर्चमध्ये भाविकांना धार्मिक शिक्षण उपासना व येशू ख्रिस्ताने दिलेले शिक्षण दिले जाते तसेच येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण ,सत्य मार्ग व जीवन,प्रीतीचे शिक्षण देऊन समाजा मध्ये एकीने वागावे,सर्वानी एकमेकांशी बंधु-भगिनींच्या भावनेने वागावे असे सांगितले.यावेळी भाविकांसाठी  प्रार्थना सभेचेआयोजन करण्यात आले होते,प्रार्थना सभेसाठी महाराष्ट्र डिस्ट्रक्ट काँसिलचे  युथ डायरेक्टर रेव्ह जीवन ढाले,व सिस्टर सोनाक्षी ढाले हे उपस्थित होते त्यांनी आपल्या उपदेशात सांगितले की,एकमेकांवर प्रेम करा,येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मार्गावर चला,प्रमेश्वर तुम्हाला आशिर्वादीत करेल,दीनांची सेवा करा, गरीबाना मदत करा, त्यांची सेवा करा, सत्य मार्गाने चला,धार्मीकतेने वागा,अशी शिकवण प्रभु येशू ख्रिस्ताने दिली आहे त्याचे पालन करा.या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी वर्धापनदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले, त्यात प्रामुख्याने करणदादा ससाणे,रवींद्र गुलाटी, दीपक कदम,लकी सेठी,रमादेवी धिवर, रवींद्र लोंढे,प्रकाश केदारी,सुनील वाघमारे ,सुरेंद्र साळवे,तसेच ऑल पास्टर्स फिलॉशिपचे पदाधिकारी,पास्टर विजय खाजेकर,पास्टर बारसे,पास्टर लाजस देठे,पास्टर तेलोरे आदि अन्यवर उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीतेसाठी चर्च मंडळी, महिला आघडी,युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले,त्यात प्रामुख्याने अभाजीत केदारी,आशुतोष केदारी, सनी वाघमारे,सुयश मकासरे,अविनाश पडघलमल,सिस्टर लबडे,सिस्टर संगीता मकासरे,सिस्टर वडागळे सिस्टर केदारी,सिस्टर,घोरपडे,सिस्टर वाघमारे,सिस्टर मंगल आवटी, सिस्टर  यमुना कांबळे,सिस्टर सुनीता मकासरे सिस्टर श्रध्दा केदारी,सिस्टर तृप्ती मकासरे,सिस्टर प्रीती कांबळे, सिस्टर ज्योती पडघलमल,सिस्टर ठोंबरे, स्यामी वडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्र संचलन बी एस कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वरंजन मकासरे यांनी केले.