टाकळीमिया शिवारातील अपघातातील जखमींच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या आरोपातून आरोपीची ता.राहुरी मा. न्यायालय कडून निर्दोष मुक्तता .
टाकळी मीया शिवारातील मुसलवडी ते टाकली मीया रोडवर हॉटेल न्यू समाधान समोर दिनांक १६/०१/२०१६ रोजी सायंकाळी ७-०० वाजता आरोपी याने अपघातातील जखमींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपातून राहुरी न्यायालयाने आरोपी प्रवीण कांतीलाल पटारे याची नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी सविस्तर हकीगत अशी आहे की, राहुरी कोर्ट स्थळ सीमा हद्दीतील मौजे टाकळी मीया शिवारात मुसळवाडी ते टाकळी मीया रोडवर हॉटेल न्यू समाधान समोर दि.१६/०१/२०१६ रोजी सायंकाळी ७-०० वाजण्याच्या सुमारास आरोपी =प्रविन कांतीलाल पटारे याने त्याचे ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल ही टाकळी मीया कडून मुसळवाडी कडे भरधाव वेगाने चालून रस्त्याचे व रहदारीचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणारी बजाज कंपनीची मोटार सायकल हिस राँग साईटला जाऊन समोरून जोराची धडक देऊन तिचे वरील मोटार सायकल स्वाराचे मृत्यूस स्वतः चे गंभीर दुखापतीस व दोन्ही मोटार सायकल चे नुकसानीस कारणीभूत झाला व लायसन नसताना वाहन चालविले म्हणून आरोपीचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन ने दि.१३/१२/२०१६ रोजी गु.र.न. T १७७/२०१६ अन्वये भा. द.वि.क.३०४(अ,२७९,३३७,३३८,४२७, व मो.वा. का.क.१८४,३(१),१८१,१४६,१९६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र मा.न्यायालयात पाठविले .त्यास एस. सी.सी. न.६५/२०१७ हा क्रमांक पडला . मा. न्यायाधीश एम.पी.मथुरे साहेब यांचे समोर सदर खटला चालला.सदर खटला हा गुण दोषावर चालला .फिर्यादी तर्फे साक्षीदार तपासले आरोपी तर्फे ज्येष्ठ विधज्ञ व नोटरी पब्लिक अँड.प्रकाश संसारे यांनी आरोपीचे वतीने सदर साक्षीदारांची उलट तपासणी घेतली.
सरकार पक्षाने सरकारी साक्षीदार ही तपासले व त्यांचीही अँड.प्रकाश संसारे यांनी उलट तपासणी केली व खटला गुण दोषावर चालला व सबळ पुराव्याच्या अभावी आरोपी प्रवीण कांतीलाल पटारे याची मे.न्यायालयाने तारीख १२/०५/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली.आरोपी तर्फे ज्येष्ठ विधज्ञ व नोटरी पब्लिक अँड.प्रकाश संसारे यांनी काम पाहिले .
__**__. _**_ _**_
प्रति,
Ma. Sampadk /vartahar,
Aaplya lokpriy dainikat ,pakshikat v portlavr sadrchi batmi prasidh kravi hi vinati ahe.
Ad. Prkash sansare , rahuri.