पाथरवाला विविध कार्यकारी सोसायटी संचालकपदी मालनबाई पांडू फुलमाळी यांची निवड करून तिरमली समाजावर दाखवला मोठा विश्वास. अनेक संघटनेचा वतीने सन्मान.
नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील आत्ताच झालेल्या विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक पदी मालनबाई पांडू फुलमाळी यांची निवड झाली .पाथरवाला ग्रामस्थांनी एका पालात राहणाऱ्या तिरमली समाजावर मोठा विश्वास दाखवला. पाथरवाला हे शाहू, फुले ,आंबेडकर विचार वादी असणारआदर्श गाव नेहमीच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे गाव आहे. म्हणून नेवासा तालुक्यात प्रथमच पाथरवाला या गावाने बारा बलुतेदार मधील एक संचालक घेऊन मोठा बहुमान मिळवला आहे.
या कार्य गौरव कामाची तालुकाभर कौतुक होत आहे. या निवडणुकीसाठी विशेष सहकार्य रिपब्लिकन पीपल्स पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष मधुकर पावशे व युवा नेते अनिल राव खाटीक यांनी केले.
या निवडीबद्दल विविध शाखेच्या संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान होत आहे. वंचित बहुजन आघाडी च्या नेवासा तालुका कमिटीने या पाथरवाला सहकारी सोसायटीचे विशेष आभार मानत मालनबाई फुलमाळी यांचा सन्मान केला आहे .यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते बलभीम सकट यांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सन्मान केला.
यावेळी मुस्लीम समाज, तिरमली समाज, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्राचे शिक्षक व पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मान झाला आहे.
या सन्मानाच्या वेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भेंडा चे शिक्षक सूर्यकांत कदम सर, भारतीय पत्रकार संघटनेचे तालुका प्रतिनिधी पत्रकार युनूस भाई पठाण ,उत्तमराव फुलमाळी ,संजय फुलमाळी, दीपक संजय इंगळे व महिला भगिनी व मान्यवर उपस्थित हो
ते.