राज पतसंस्थेचे संस्थापक संतोषभाऊ टांगळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्यावतीने सन्मान.

राज पतसंस्थेचे संस्थापक संतोषभाऊ टांगळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनेच्यावतीने सन्मान.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे राज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष टांगळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी अनेक संघटनांनी त्यांचा सन्मान केला.

   हा कार्यक्रम ह भ प शिवचरित्रकार कृष्णा महाराज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत देडगाव , निलेश भाऊ कोकरे युवा मंच ,वंचित बहुजन आघाडी, बळीराज्य संघटना, मुस्लिम संघटना , माजी विद्यार्थी संघ ,पत्रकार संघटना अशा विविध संस्थेच्या वतीने राज पतसंस्थेचे चेअरमन संतोष भाऊ टांगळ यांचा सन्मान करण्यात आला. 

       यावेळी आनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये माजी विद्यार्थी संघ 2003 ग्रुपचे मार्गदर्शक गणेश एडके सर यांनी त्यांच्या बालपणीच्या जीवन बद्दल अनमोल अशी माहिती दिली. नंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मीडिया सेलचे अध्यक्ष हरिभाऊ तागड,प्रगतशील बागातदार लक्ष्मण मुंगसे युवा नेते निलेश कोकरे, माजी चेअरमन खंडेश्वर कोकरे, अशा अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वांचे ऋण व्यक्त करत संतोष भाऊ यांनी माझ्या सन्मानाने मी भारावून गेलो व भविष्यात गोरगरीब, शेतकरी ,मजूर ,कष्टकरी ,यांच्यासाठी राज पथसंस्था या माध्यमातून चांगलं काम करण्याचा मानस व्यक्त केला.

      यावेळी देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,मुस्लिम समाजाचे रज्जाक भाई पठाण, पत्रकार विष्णू मुंगसे, बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, भाजप युवा मोर्चाचे तालुका उपप्रमुख आकाश भाऊ चेडे, उध्दव मुंगसे, श्रीकांत हिवाळे, सचिन हिवाळे, विश्वास हिवाळे, महादेव मुंगसे, भारत औटी, सुदेश कोलते, नारायण कोलते, सुरेश कोलते, नवनाथ मुंगसे, दिलदार सय्यद, वंचीत चे अशोक जावळे, श्रीकृष्ण कदम, संदीप मुंगसे, बापू कुटे, अशोक तांबे, नवनाथ रक्ताते, व माजी विद्यार्थी संघ 2003 चे सर्व संचालक, राज पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी व देडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी तर आभार बळीराज्य संस्थेचे संस्थापक मच्छिंद्र मुंगसे यांनी मान

ले.