युनियन बँक ऑफ इंडिया सोनई शाखेचा 53 वा वर्धापन दिन साजरा सोन‌ई

युनियन बँक ऑफ इंडिया सोनई शाखेचा 53 वा वर्धापन दिन साजरा सोन‌ई

युनियन बँक ऑफ इंडिया सोनई शाखेचा 53 वा वर्धापन दिन साजरा सोन‌ई

 /वार्ताहर /. दि 10. युनियन बँक ऑफ इंडिया भारतभर 104 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असल्याबद्दल सर्वत्र वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे सोनई गावात या बँकेची शाखा सुरू होऊन 53 वर्ष पूर्ण होऊन आज 54 व्या वर्षात पदार्पण केले आहे. अविरत ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांचा सोनई येथील संदीप दादा कुसळकर मित्र मंडळाच्या तसेच सोन‌ई ग्रामस्थांच्या वतीने व सोनई ग्रामपंचायतचे सरपंच धनंजय वाघ यांच्या उपस्थितीमध्ये येथील बँक कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन व केक कापून सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योजक अनिल निमसे,जमशेद भाई सय्यद सोनई सोसायटीचे माजी संचालक दिलीप काका शिंदे ज्येष्ठ पत्रकार अशोकराव भुसारी पत्रकार मोहन शेगर ऋषी गवळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बोरु प्रेस फोटोग्राफर संतोष तेलो आधी उपस्थित होते आज वर्धापनदिनानिमित्त गृह कर्ज,इतर मिळवून पंचवीस लाखांचे वितरण करण्यात आले या आगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना संदीप कुसळकर म्हणाली की सोनई युनियन बँकेच्या शाखेमध्ये अनिता शिंदे मॅडम यांनी गेली पंचवीस वर्षे सोनई गावात कुठलाही भेदभाव न करता गोरगरीब असूशिक्षित वयोवृद्ध महिला पुरुष असा गरीब खातेदारांना अशा गरीब खातेदारांना स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरतपणे सेवा केल्याबद्दल त्यांचे संपूर्ण सोन‌ई कराच्या वतीने का सन्मान करण्यात आला यावेळी माजी सरपंच राजेंद्र बोरुडे व युनियन बँकेचे सोन‌ई शाखेचे व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले यावेळी बँकेच्या खात्याचा खातेदाराबरोबरच सोन‌ई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते