आपल्या पाल्याची स्वप्ने साकार करण्यासाठी पालकांनी सज्ज राहावे.: - सुनिल जायभाये

आपल्या पाल्याची स्वप्ने साकार करण्यासाठी पालकांनी सज्ज राहावे.: - सुनिल जायभाये

आपल्या पाल्याची स्वप्ने साकार करण्यासाठी पालकांनी सजग रहावे - सुनील जायभाये

 

 भारत भालेराव 

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु : पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांना भविष्याविषयी जागरूक करण्याचे कार्य शाळा शिक्षणाबरोबर करत असते परंतु आपल्या पाल्याची स्वप्ने साकार करण्यासाठी पालकांनी सजग राहून अभ्यासातील प्रगतीविषयी शिक्षक आणि पालक यांच्यात सवांद होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे आयोजित शिक्षक-पालक मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.शिक्षक मनोगतात ईश्वर वाबळे यांनी पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांची शिक्षण विषयक प्रगतीबाबत शिक्षकांशी संपर्क वेळोवेळी करून गुणवत्तेविषयी चर्चा केली पाहिजे तसेच शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रमात आपल्या पाल्याचा सहभाग वाढवावा असे मत मांडले.

विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे यांनी पौगंडावस्था हा वादळाचा काळ असतो या काळात विद्यार्थी शिक्षक आणि मित्र यांच्याशी मुक्त संवाद साधत असतो आणि म्हणून या वयात विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली तर निश्चित अडचणी दूर होतात यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात समनव्य असणे गरजेचे आहे असे मत मांडले.या मेळाव्यास पालक देवीदास गिर्हे बाबासाहेब कराड भीवसेन केदार संजय बकाल लक्ष्मण पाटेकर संजय साबळे सत्तेश्वर डाके आसाराम उकिर्डे नानासाहेब उगले उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम पूनम वाबळे यांनी तर प्रस्ताविक अमोल भालसिंग यांनी केले कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संजय पवार यांनी मानले.

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे पर्यवेक्षक सुनील जायभाये यांचेसह विद्यालयातील सर्व शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.