सोनई पोलिस ऍक्शन मोडवर चांदा--कुकाणा रोडवरील बेकायदा दारु अड्यावर सोनई पोलिसांची कारवाई..

चांदा--कुकाणा रोडवरील बेकायदा दारु अड्यावर सोनई पोलिसांची कारवाई..
नगर जिल्हा प्रतिनिधी //नेवासा तालुक्यातील चांदा ते कुकाणा रोडवरील बेकायदा दारु अड्यावर सोनई पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २८ जुलै रोजी चांदा ते कुकाणा रोडवरील हाॅटेल सह्याद्री च्या आडोशाला राजेंद्र बापुराव जावळे वय ३८ रा चांदा हा बेकायदा विना परवाना दारु विक्री करत असताना आढळुन आला.त्याचेकडे अनेक प्रकारची देशी विदेशी कंपनीची दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळुन आला. १७.३२५ रुपये किंमतीची बेकायदा दारु जप्त करण्यात आली. पो. काॅ. रविकांत गर्जे यांनी दाखल केलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ३१९/२०२४ महा. प्रोव्ही . अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत.