खेडले परमानंद येथील हाजी हसनभाई इनामदार यांचे दुःखद निधन.

प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा.
खेडले परमानंद येथील जुन्या पिढीचे ज्येष्ठ नागरिक हाजी हसनभाई इनामदार यांचे 11 ऑगस्ट 2022 रोजी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
संपूर्ण राज्यभर त्यांची ख्यातनाम कुस्तीपटू म्हणून ख्याती होती.
ते माननीय खासदार यशवंतराव गडाख यांचे खास मित्र होते.
खेडले परमानंद येथील समाजसेवक हरपल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.