चाईल्ड करिअर जुनियर कॉलेज सलबतपुर चा बारावीचा १००% निकाल.

चाईल्ड करिअर जुनियर कॉलेज  सलबतपुर चा बारावीचा १००% निकाल.

*चाईल्ड करिअर ज्युनिअर कॉलेज चा निकाल 100%*

 *कु. गौरी काळे प्रथम, कु. हर्षदा गाडेकर द्वितीय तर कु. वर्षा शिंदे तृतीय*

         नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर ज्युनिअर कॉलेज चा पहिल्याच ब्याच चा इयत्ता बारावीचा निकाल 100% लागला.

        सदर कॉलेज मध्ये कू.गौरी काळे प्रथम , कू.हर्षदा गाडेकर द्वितीय तर कू.वर्षा शिंदे तृतीय आली आहे.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व निश्चित धेय ठेवल्यास यश निश्चित मिळते.कोणत्याही परीक्षेतील यश हे स्वतः च्या मेहनतीवर व शिक्षकांच्या मार्गदर्शनवर अवलंबून असते असे प्रतिपादन चाईल्ड करिअर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक श्री. सागर बनसोडे सर यांनी केले.विद्यार्थ्यांना शिक्षक श्री संदीप खाटीक,शाहरुख सय्यद, अमोल इंगळे,संजय गरुटे,विजय खाटीक,श्रीमती लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे सर,तसेच ग्रामस्थ,पालक व शाळा व्यवस्थापन समिती ने अभिनंदन केले.