पारनेरमध्ये वाळू तस्करावर मोठी कारवाई – ₹20.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

पारनेरमध्ये वाळू तस्करावर मोठी कारवाई – ₹20.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

पारनेरमध्ये वाळू तस्करावर मोठी कारवाई – ₹20.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी//प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

अहिल्यानगर, दिनांक 26 जून 2025 –
पारनेर तालुक्यात वाळू तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ₹20,40,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे, तर दुसरा फरार आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोनि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार व भगवान थोरात यांचा समावेश होता.

दिनांक 26 जून 2025 रोजी, पथकाने पारनेर पोलीस ठाणे हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पळसपूर शिवारातील महावितरण सब स्टेशनजवळ सापळा रचला. काही वेळातच एक संशयित विनाक्रमांकाचा टाटा ढंपर (मॉडेल 1618) त्या ठिकाणी येताना दिसून आला. त्याला थांबवून विचारपूस केली असता राहुल कुंडलीक भाईक (वय 33, रा. कातळवेढा, ता. पारनेर) असे नाव सांगितले.

ढंपरची तपासणी केली असता त्यामध्ये परवाना नसलेली वाळू आढळली. त्यामुळे वाहनासह ₹20,00,000/- किंमतीचा ढंपर व ₹40,000/- किंमतीची वाळू असा एकूण ₹20,40,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी आरोपी राहुल याला विश्वासात घेऊन वाहन मालकाबाबत विचारले असता त्याने उल्हास भाऊसाहेब दरेकर (रा. देसवडे, ता. पारनेर) याचे नाव सांगितले. उल्हास सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. 504/2025, भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन