ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका विवाहित तरुणीचा आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या घरात घुसुन तुला बघून घेतो, अशी धमकी देण्यात आली

ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका विवाहित तरुणीचा आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या घरात घुसुन तुला बघून घेतो, अशी धमकी देण्यात आली

ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका विवाहित तरुणीचा आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून पाठलाग केला. त्यानंतर महिलेच्या घरात घुसुन तुला बघून घेतो, अशी धमकी देण्यात आली. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

           एक २६ वर्षीय विवाहित तरुणी राहुरी तालुक्यातील एका गावात राहते. त्यांचे राहुरी शहरात ब्युटीपार्लर शॉप असून त्या येऊन जाऊन आपले ब्युटीपार्लर शॉप चालवीतात. सदर तरुणीचे व आरीपीचे तीन वर्षापूर्वी वाद झाले होते. त्याबाबत तरुणीने राहूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दि. ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजता पिडीत तरुणी राहुरी येथून घरी जात असताना आरोपी हा तिच्यावर लक्ष ठेवून तीच्या मागे मागे गेला. त्यानंतरही आरोपी वारंवार पिडीत तरुणीच्या घराचे समोर फेऱ्या मारत असतो. तसेच गेली सहा महिन्यापासून आरोपी पिडीत तरुणीच्या मोबाईलवर वारंवार फोन करतो. म्हणून तरुणीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आहे. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत तरुणी घरात असताना आरोपी तीच्या घरात घुसला आणि काहीही कारण नसताना तरुणीला म्हणाला की, तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.

            घटने नंतर पिडीत तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी वैभव यादव भालेराव, रा. वरवंडी, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ४२०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३३३, ३५१ (२) प्रमाणे विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वैराळ हे करीत आहे.

राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे