गळ्यातील मिनी गंठण तोडुन धुम स्टाईलने चोरी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एम आय डीसी जवळील सूत गीरणी समोर दि. २४ एप्रिल रोजी दुपारी घडली.
राहुरी प्रतिनिधी,
पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी दुचाकीवर रस्त्याने जात असलेल्या शिक्षीकेचा विनयभंग केला. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवुन त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण तोडुन धुम स्टाईलने चोरी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील एम आय डीसी जवळील सूत गीरणी समोर दि. २४ एप्रिल रोजी दुपारी घडली.

राहुरी शहरातील एका खाजगी शाळेत एक २७ वर्षीय महिला शिक्षीका म्हणुन कार्यरत आहे. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० वाजे दरम्यान सदर शिक्षीका व त्यांची एक शिक्षीका मैत्रीण अशा दोघीजणी शाळेचे कामकाज उरकून दुचाकीवरून राहुरीकडून राहुरी फॅक्टरीकडे जात असताना राजश्री हॉटेलसमोर पाठीमागुन एम एच १७ बीजे ४०७३ या क्रमांकाच्या मोटरसायकलवर दोन भामटे आले. त्यावेळी मोटरसायकल चालवणारा भामट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शिक्षीकेच्या खांद्याला हात लावुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले आणि म्हणाला कि, माझे पाठीमागे बसलेला इसम तुला आवडतो का, असे म्हणाला. त्यावेळी दोन्ही शिक्षीकांनी त्यांचेकडे दुर्लक्ष करुन पूढे गेल्या. त्यानंतर एम आय डीसी जवळील सूत गीरणी समोर असताना ते भामटे पून्हा आले. आणि त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवुन एका शिक्षीकेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडुन धुम स्टाईलने पसार झाले.
घटने नंतर सदर शिक्षीकेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा रजि. नं. ४१८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३०९ (४) प्रमाणे विनयभंग व रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते हे करीत आहे.
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे








