*म.फु.कृ.विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेश द्वारावर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आज सोडले.*

*म.फु.कृ.विद्यापीठाच्या प्रमुख प्रवेश द्वारावर सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे उपोषण आज सोडले.*

दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी चे उपोषण आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी मा.खासदार निलेशजी लंके तसेच उपकुलसचिव व्ही.टी.पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले

प्रकल्पग्रस्तांसाठी च्या भरतीची जाहिरात दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी प्रसारित करण्यात आली जाहिरात प्रसिद्ध होऊन आठ महिने पूर्ण होत आले आहे तरी देखील विद्यापीठ प्रशासन भरती प्रक्रिया पूर्ण करत नव्हते. वर्ग चार मधील ज्या पदांना परीक्षा आहे व वर्ग तीन मधील सर्व पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी प्रकल्पग्रस्त विद्यापीठाच्या गेट समोर उपोषणासाठी बसले होते. दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख व विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय राजेंद्रजी पाटील साहेब यांच्याबरोबर सन्माननीय निलेशजी लंके साहेबांनी व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी यांनी चर्चा करून टीसीएस कडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने पाठपुरावा करून लवकरात लवकर वेळापत्रक प्रसिद्ध करावे. तसेच भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे चर्चेअंती ठरले व या अटीवर प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सोडले.