नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव परिसरात दिवसाढवळ्या स्टील घेऊन जाणारा ट्रक चोरट्यांनी लुटला.

नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव परिसरात दिवसाढवळ्या स्टील घेऊन जाणारा ट्रक चोरट्यांनी लुटला.

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद.

            वर्दळीच्या भर रस्त्यामध्ये दिवसाढवळ्या जालना येथून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक MH 12 AP 3295 या स्टील (लोखंडी सळ्या) घेऊन जाणाऱ्या ट्रक ला चार अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना नगर औरंगाबाद रोड वर घोडेगाव परिसरात शनिवार म्हणजे काल दुपारी घडली आहे.

           घटनेचा सविस्तर वृत्तांत असा आहे की अज्ञात चोरट्यांनी जालन्या कडून आलेल्या व पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक ला चार अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल ने पाटलाग करून मोटरसायकल आडव्या लावल्या.

 संबंधित चालकास हत्याराचा धाक दाखवून वाहनावर ताबा घेतला. नंतर वाहनास एकांतात नेऊन सदर गाडीमध्ये असलेले स्टील उतरून घेतले. व ड्रायव्हरला नगर औरंगाबाद रोड वर एकांतात सोडून दिले.

         ट्रक ड्रायव्हर निसार गुलाम शेख राहणार आश्रब नगर पुणे यांनी सोनई पोलीस ठाण्यात घडलेल्या घटने संबंधी फिर्याद दिली.

           या परिसरात नेहमीच वाहनाच्या लुटीचे प्रकार घडत असतात. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली. फौजदार उमेश पतंगे यांच्यासह पथकाची नेमणूक करून तपास कार्याला गती दिली.