*स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालयात औषध निर्मितेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण संप्पन्न.*
राहुरी (प्रतिनिधी): स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय, राहुरी येथे विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदिक औषध निर्मिती या विषयावर विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आयुर्वेदिक औषध निर्माता व प्रशिक्षक संदीप त्र्यंबके सर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषध निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया, कच्च्या औषधी द्रव्यांची निवड, गुणवत्तेची काळजी, उत्पादनातील आवश्यक तांत्रिक बाबी तसेच औषध निर्मितीतील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवर प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक डॉक्टर अनंतकुमार शेकोकर सर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गार्गी हर्बल प्रोडक्टचे संचालक संदीप त्र्यंबके सर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयुर्वेद क्षेत्रात संशोधन, गुणवत्तापूर्ण औषध निर्मिती आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले असून उपस्थितांनी अशा प्रकारचे व्यावहारिक प्रशिक्षण भविष्यातही आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यासाठी गार्गी हर्बल प्रोडक्टचे मार्केटिंग प्रमुख विठ्ठल ठोंबरे यांनी सर्व नियोजित केले तसेच यावेळी आयुर्वेद कॉलेजच्या सर्व टीमचे नियोजन देखील खूप चांगल्या पद्धतीने केले होते.








